म्हापसा : लर्निंग स्फिअर्सतर्फे संडे सायन्स स्कूल पुणेच्या सहकार्याने एक दिवशीय विज्ञान मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन बुधवार दि. ७ रोजी कण्यात आले आहे. कवळे येथील श्री सरस्वती विद्यालयात ही विज्ञान कार्यशाळा होणार आहे. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना विज्ञानासंबंधी विविध उपक्रम शिकविण्यात येणार आहेत. विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना गोडी वाटावी, याबाबत ही मार्गदर्शन कार्यशाळा असून त्यात विज्ञानाशी निगडीत अनेक उपक्रम साकारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. गुरूवार दि. ८ रोजी दुसरी कार्यशाळा पणजीतील इन्स्टट्यिूट मिनेझिस ब्रागांझाच्या साहित्य सेवक मंडळ सभागृहात होणार आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसाठी विज्ञान कार्यशाळा
By admin | Updated: May 7, 2014 01:01 IST