शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पणजीत बुधवारपासून विज्ञान चित्रपट महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 20:03 IST

गोव्यात पणजीतील मॅकनीज पेलेस व आयनॉक्समध्ये होणारे सायन्स फिल्म फेस्टीवल हे १६ जानेवारी ते १९ जानेवारी या काळात होणार असून या महोत्सवात ९ फिचर फिल्म अणि ३० फिल्म व माहितीपटांचे प्रदर्शन होईल.  

पणजी - गोव्यात पणजीतील मॅकनीज पेलेस व आयनॉक्समध्ये होणारे सायन्स फिल्म फेस्टीवल हे  १६ जानेवारी ते १९ जानेवारी या काळात होणार असून या  महोत्सवात ९ फिचर फिल्म अणि ३० फिल्म व माहितीपटांचे प्रदर्शन होईल.  गोवा व महाराष्ट्रातील १२४ संस्थांचे उपक्रम त्यात होणार आहेत.  देशातील ६० शस्त्रज्ञ व संशेधक या महोत्सवातील विविध कार्यक्रमात रिसोर्स पर्सन म्हणून उपस्थित राहणार अहेत. समुद्राचे भविष्य, तंत्रज्ञान आणि संशोधन आणि मूलभूत विज्ञान या तीन संकल्पनांवरील फिल्म ट्रॅक्सवर आधारित चित्रपट या महोत्सवाला पाहायला मिळतील. तसेच समुद्रातले जीवन आणि अनुकूलनता, बायो- कम्युनिकेशन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व प्रदुषणाचा परिणाम आणि हवामान बदल या विषयावरही चित्रपट व माहितीपट दाखविले जाणार आहेत.  हा महोत्सव विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, कार्यशाळा, फिल्म स्क्रीनिंग, प्रसिद्ध शास्त्रज्ञ व नामवंतांबरोबर चर्चा यांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. विज्ञान प्रसार चे संचालक डॉ. नकुल पराशर हे उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे असतील आणि पद्मविभूषण डॉ. राजगोपाला चिदंबरम हे निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहातील. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी ही माहिती दिली. डॉ. शेखर मांडे, प्रो. शर्मिष्ठा बॅनर्जी, डॉ. अरविंद रानडे, डॉ सुमीत के. मिश्रा,  पर्यावरण विज्ञान आणि बायोमेडिकल, हे फिल्म्सवर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहातील, तर प्रो. बॅनर्जी १८ जानेवारी रोजी शिक्षकांची कार्यशाळा घेतील आणि डॉ. रानडे १८ व १९ जानेवारी रोजी टेलिस्कोप कार्यशाळा घेतील, ज्यामध्ये सहभागींना त्यांचे स्वत:चे उपकरण तयार करता येणार आहे.  फिल्म स्क्रीनिंगशिवाय फिल्म मेकिंग कार्यशाळा आणि प्रशिक्षण या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. यामुळे प्रेक्षकांना  लाइव्ह प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञान अधिक मजेदार व अर्थपूर्ण मागार्ने जाणून घेण्याची नवी संधी मिळेल तसेच फिल्म इंडस्ट्रीमधला त्याचा वापरही माहीत करून घेता येईल, अशी माहिती तालक यांनी दिली.

टॅग्स :cinemaसिनेमाgoaगोवा