शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खा, प्या, पण दारू पिऊ नका; कार्निव्हलच्या चित्ररथांतून संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 21:45 IST

कार्निव्हलच्या चित्ररथांमधून पर्यावरण रक्षणाचा संदेश

पणजी: खा, प्या व मजा करण्याचा संदेश देत जरी कार्निव्हलचा किंग मोमो देत असला तरी यंदाच्या कार्निव्हलमध्ये जलसंवर्धन, पर्यावरण रक्षण, वन्यजीव रक्षण व नशाबाजी न  करण्याचा संदेश देणारे चित्ररथ पाहायला मिळाल्यामुळे पणजीतील कार्निव्हल एक प्रकारचा भावनिक स्पर्श करून गेला. लोकांच्या उत्साही गर्दीने कार्निव्हल साजरा करण्यात आला. मिरामार दोनापावला रस्त्यावर संध्याकाळी चार वाजता सुरू झालेली कार्निव्हलची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालली होती. राज्यातील विविध ठिकाणाहून आलेले चित्ररथ हे जितके लक्षवेधून घेणारे होते तितकेच चांगला संदेश देणारे होते. किंक मोमो बनलेले विलिएम्स एनेस यांनी रितीरिवाजानुसार  खा प्या व मजा करण्याचा संदेश दिला असला, तरी दारू पिऊ नका असा संदेश देणारे चित्ररथ कार्निव्हल मिरवणूकीत होते. शिवाय नशेत वाहने चालवू नका असे सांगणारेही चित्ररथ होते.  पाणी हे जीवन आहे. पाण्याचे संवर्धन करणे किती महत्त्वाचे आहे याचे कलेतून महत्त्व पटवून देणारा चित्ररथही लोकांचे लक्ष वेधून घेत होता. त्याच धर्तीवर बनविण्यात आलेला वन्य जीवांचे रक्षण करण्याचा संदेश देणाराही चित्ररथ होता. ‘संगीतकार’ ही वेगळीच कलाकृती साकारताना एक फार  मोठा ढोल व त्यामागे सर्व प्रकारची वाद्ये वाजविणारे कलाकार अशी संकल्पना वेगळ्या पद्धतीने साकारलेला  चित्ररथ मिरवणुकीत सामील करण्यात आला होता. पर्यावरण, प्लॅस्टीक प्रदूषण, स्वच्छ भारत या सारखे संदेश देणारे चित्ररथही होते. 

केरळ पूरग्रस्तांची कृतज्ञताकाही महिन्यांपूर्वी केरळात आलेल्या महापुराने हाहाकार माजविला होता. केरळातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून जसा मदतीचा ओघ सुरू होता तसा गोव्यातूनही सुरू होता. गोव्याने संकटकाळात केलेल्या या मदतीचे स्मरण ठेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केरळाहून आलेले एक पथक या चित्ररथात सामील झाले होते. थँक्स गोवा लिहिलेले फलक व झेंडे घेऊन ते नाचत होते 

टॅग्स :goaगोवा