शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

म्हादई वाचविण्यासाठी संगीतप्रेमींची साद, सरकारच्या निर्णयाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 23:00 IST

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाला देऊ नये, यासाठी गोव्यातील संगीतकारांनी रविवारी सकाळी मेरी इमॅक्युलेट चर्चच्या पाय-यावर म्हादई नदीवरील आणि प्रेरणादायी गीते गाऊन संगीतमय विरोध दर्शविला.

पणजी : म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाला देऊ नये, यासाठी गोव्यातील संगीतकारांनी रविवारी सकाळी मेरी इमॅक्युलेट चर्चच्या पाय-यावर म्हादई नदीवरील आणि प्रेरणादायी गीते गाऊन संगीतमय विरोध दर्शविला. राज्य सरकार कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्यासाठी तयार झाले आहे.एवढी वर्षे राज्यात म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊ नये म्हणून पर्यावरणप्रेमी, समाजकार्यकर्ते तसेच बिगर सरकारी संस्था लढा देत आहेत. पाणी तंटा लवादापुढे म्हादईच्या पाण्याविषयी निकाल लवकरच येणार असताना सरकारकडून वेगवेगळी मते दर्शविली जात आहेत. राजकीय अंगाने सरकार कर्नाटकातील विरोधी पक्षातील नेत्यांना जवळ करून नवा वाद निर्माण करीत आहे. त्यातच सरकारच्या सतत बदलत्या मतांमुळे राज्यात विरोधी पक्षासह सर्वजण रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील संगीतप्रेमींनी म्हादय आमची आवय म्हणून गीते गाऊन सरकारच्या निर्णयाला आज विरोध दर्शविला. यामध्ये राज्यातील प्रख्यात संगीतकार सिद्धनाथ बुयांव, सुदीप दळवी, कॅनडी अल्फान्सो, विल्मेक्स आणि शेरॉन यांनी सहभाग घेतला.मेरी इमॅक्युलेट चर्चच्या पाय-यावर उभे राहून या संगीतकारांनी वाद्य वाजवीत गायन केले. सिद्धनाथ बुयांव यांनी खळखळून व्हावता म्हादयं, गोयंकारा श्वास रे म्हादय, मांडवीचे प्राण रे म्हादय, अस्तित्व तिचें गोंयकारा जागय ! हे म्हादई नदीवरील गीत सादर केले. इतर गायकांनीही म्हादई नदीवरील, तसेच इतर स्फूर्ती गीतांचे गायन केले.या आंदोलनातून म्हादई वाचवा हा संदेश देण्याचा संगीतप्रेमींचा प्रयत्न होता. मनोहर पर्रीकर यांनी विरोध करणा-यांना पाठिंबा देणारे हे नुकतेच कलाकार म्हटले होते, त्या विधानावर यावेळी बुयांव यांनी टीका केली. पर्रीकर यांनी संसार हे व्यासपीठआहे, हे समजून घ्यावे. आपण एक कलाकार आहोत, तुम्ही खलनायक बनू नये, असा सल्लाही बुयांव यांनी यावेळी दिला.