शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा लढविणार- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 20:26 IST

येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना गोव्यात दोन्ही जागा लढविणार असल्याचे गोवा शिवसेनेचे प्रभारी खासदार संजय राऊत यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

पणजी: येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना गोव्यात दोन्ही जागा लढविणार असल्याचे गोवा शिवसेनेचे प्रभारी खासदार संजय राऊत यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. गोवा सुरक्षा मंचाशी असलेली युती कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले ‘येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे गोव्यात उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असणार आहेत. या बाबतीत शिवसेना आणि सुभाष वेलिंगकर यांची बाठक मुंबईला झाली आहे. गोसुम लोकसभा निवडणुकीत रिंगणात असणार नाही, परंतु शिवसेनेच्या उमेदवारांना मंचाचा पाठिंबा राहणार आहे. कारण गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेची युती आजही अस्तित्वात आहे’.महाराष्ट्रात शिवसेना सरकारात असली तरी सेनेची भाजपबरोबर युती नाही आहे. येत्या लोकसभा निवडणुकीतही युती राहणार नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतही ती नव्हती. निवडणुकीनंतर अस्थीरता संपविण्यासाठी सेना सरकारात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात विविध मुद्यावर भुमिका  घेण्यासाठी गोवा सेनेला पूर्ण स्वातंत्र्य असल्याचेही त्यांनी सांगितले. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा गोवा विधानसभा संकुलात उभारण्याची सेनेच्या मागणीविषयी विचारले असता त्यांनी हे सांगितले.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीचे प्रदुषण महागात पडल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या आजारामुळे गोव्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून त्यांची जागा घेणारा दुसरा कुणीही पात्र नेता भाजपात नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरी फळी निर्माणच करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आजारामुळे पक्षात आणि सरकारातही नैराश्य पसरले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृति लवकर सुधारून ते लवकर बरे होवू देत अशा  शुभेच्छा ही त्यांनी व्यक्त केल्या. 

जितेश कामत राज्यप्रमुखजितेश कामत यांची शिवसेनेचे गोवा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राऊत यांनी केली. यापूर्वी त्यांच्याकडे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रवक्ते राखी प्रभुदेसाई, संपर्क प्रमुख जीवन कामत व  इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत