शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

सनातनचा रुद्र पाटील मोस्ट वाँटेड

By admin | Updated: September 22, 2015 00:45 IST

पणजी/कोल्हापूर : सनातन संस्थेचा रुद्र पाटील हा कार्यकर्ता कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मोस्ट वॉण्टेड ठरला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक पोलीसही

पणजी/कोल्हापूर : सनातन संस्थेचा रुद्र पाटील हा कार्यकर्ता कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मोस्ट वॉण्टेड ठरला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक पोलीसही एनआयएच्या मदतीने युद्धपातळीवर रुद्र पाटीलचा शोध घेत आहेत. २००९ साली दिवाळी दिवशी मडगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर रुद्र पाटील हा फरार झाला होता. पोलिसांच्या राष्ट्रीय तपास पथकाला (एनआयए) तो हवा आहे. एसआयटीचे पूर्ण लक्ष आता सनातनच्या काही साधकांवर केंद्रित झाले आहे. पानसरेंच्या हत्येप्रकरणी चौकशी करत असलेल्या एसआयटीचा सनातनच्या दोन साधकांवर मुख्य संशय आहे. मडगावमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडल्यापासून रुद्र पाटील व सारंग अकोलकर हे दोघेही फरारी आहेत. मडगावमधील बॉम्बस्फोटात मलगोंडा पाटील व योगेश नाईक या दोघा साधकांचा मृत्यू झाला होता. त्यांनी स्कुटरमधून स्फोटके आणली होती व १६ आॅक्टोबर २००९ रोजी मडगावमध्ये त्यांचा स्फोट झाला होता. गेल्या आठवड्यात पानसरे खूनप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड यास अटक करण्यात आली आहे. त्या शिवाय मुंबईतील एकास व कर्नाटकमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. रुद्र पाटील हा मलगोंडा पाटीलचा जवळचा नातेवाईक आहे. रुद्र हा फरार असला, तरी समीर गायकवाड हा कायम रुद्रच्या संपर्कात होता, असे कॉल डेटा रेकॉर्डवरून एसआयटीला आढळून आले आहे. रुद्र पाटील हा कर्नाटकमधील असल्याने कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाशीही त्याचा संबंध असावा, असा पोलिसांचा कयास आहे. रुद्र पाटील व समीर गायकवाड या दोघांनीही पानसरे यांच्या हत्येपूर्वी एक महिना अगोदर कोल्हापूर येथील पानसरे कुटुंबीयांच्या निवासस्थानाच्या परिसराची पाहणी केली होती. एसआयटीकडून यापुढे लवकरच याबाबतची अधिक तपशीलवार अधिकृत माहिती जाहीर केली जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रुद्रची पत्नी प्रीती पाटील व्यवसायाने वकील असून त्यांनी समीर गायकवाड यांच्यावतीने युक्तिवाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रुद्र व सारंग अकोलकर यास एनआयएने यापूर्वीच फरार घोषित केलेले आहे. दरम्यान, सनातनचे प्रवर्तक अभय वर्तक यांच्या मते रुद्र हा निर्दोष आहे. (प्रतिनिधी)