शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

राज्यात सर्व घरांसाठी २०१७ पर्यंत संडास

By admin | Updated: December 19, 2014 03:44 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा : ‘लोकमत’ कार्यालयात संवाद

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ पर्यंत देशातील सर्व घरांना संडास तथा स्वच्छतागृहे मिळायला हवीत, असे म्हटले आहे. गोव्यात ७४ टक्के घरांसाठी संडासाची सोय आहे. त्यामुळे २०१७ पर्यंत सर्व घरांसाठी या राज्यात संडासाची सोय उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून सरकार पावले उचलत आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. गोवा मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ‘लोकमत’च्या पणजीतील कार्यालयात अतिथी संपादक म्हणून आले होते. या वेळी त्यांनी ‘लोकमत’ परिवाराशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वच्छ भारताचे ध्येय समोर ठेवले आहे. प्रत्येक नागरिकाने या ध्येयपूर्तीसाठी सहकार्य करून जबाबदारी उचलायला हवी. गोव्यातील किती विद्यालयांसाठी संडासांची सोय नाही, याची माहिती मी शिक्षण खात्याकडून जाणून घेतली. संडासच नाही व असले तरी, ते दुरुस्त करायला हवेत, अशी सुमारे १९० विद्यालये असल्याचे आढळून आले. राज्यातील कॉर्पोरेट जगताच्या मदतीने या संडासांची सोय करावी, असे मी ठरविले व तसे पत्र उद्योजक जगतासाठी लिहिण्यास मी संचालकांना सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व सरकारी शाळांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभापूर्वी स्वच्छतागृहे तथा संडास मिळतील. कॉर्पोरेट जगत त्यासाठी निश्चितच मदत करील, असा मला विश्वास आहे. एका वृत्त वाहिनीवरून मी आवाहन करताच माझ्या मांद्रे मतदारसंघातील मोरजी येथील प्रमोद राणे या रेस्टॉरंट व्यावसायिकाने मला एसएमएस पाठवला. आपण ५० ते १०० स्वच्छतागृहांची व्यवस्था करू शकतो, असे त्याने मला सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, एक लाख रुपयांत तीन संडास बांधता येतात. सर्व घरांना सरकार संडास देऊ शकते; पण नागरिकांनीही एकमेकांची जबाबदारी स्वीकारायला हवी. एखाद्या वाड्यावरील ९ पैकी ८ घरांना जर संडास आहे व नवव्या घराला नसेल तर त्या घराला संडास मिळावा म्हणून इतरांनी सहकार्य करायला हवे. एक भाऊ जर कुटुंबाच्या एकत्रित जमिनीत संडास बांधू इच्छितो, तर दुसरा भाऊ त्यास आक्षेप घेतो, अशी उदाहरणेही गोव्यात आहेत. गोव्यात अजूनपर्यंत अनेक घरांना जमिनींबाबतच्या वादांमुळेच संडास मिळालेले नाहीत. प्रत्येकास संडास बांधण्यासाठी जमीन काही सरकार देऊ शकत नाही. एखाद्या पंच सदस्याने जर आपण आपल्या प्रभागातील सर्व घरांना संडासाची सोय मिळवून देईन, असे ठरवून तसे जर करून दाखवले तर त्यास पुरस्कार देण्याचा विचारही सरकार करू शकते. वाचनालयाची स्थिती मुख्यमंत्री म्हणाले की, मी परवा साळ गावातील सरकारी हायस्कूलला भेट दिली. तेथील वाचनालयाची स्थिती मी कधीच विसरू शकणार नाही. वाचनालय असो किंवा संडास असो, सगळे सुस्थितीत असायला हवे. सर्व शाळा, पंचायती, पालिका, हायस्कुलांनी आपल्या इमारतीसाठी योग्य संडास असतील याची जबाबदारी घ्यायला हवी. विजय दर्डा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा ‘लोकमत’ पत्र समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना गोवा मुक्तिदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पार्सेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीसाठी विजय दर्डा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सरकारच्या विधायक कामात ‘लोकमत’ सदैव आपल्या पाठीशी राहील, असेही दर्डा यांनी या वेळी सांगितले. (खास प्रतिनिधी)