शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साळगावच्या कचरा प्रकल्पाची क्षमता होणार २०० टन; घन कचरा व्यवस्थापन महामंडळाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 12:23 IST

ज्या प्रकल्पामुळे गोव्यातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर झाली तसंच देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरलेला साळगाव येथील घन कचरा प्रकल्पाची क्षमता १२५ टन प्रती दिन वरुन २०० टन करण्यात येणार आहे.  

म्हापसा : ज्या प्रकल्पामुळे गोव्यातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर झाली तसंच देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरलेला साळगाव येथील घन कचरा प्रकल्पाची क्षमता १२५ टन प्रती दिन वरुन २०० टन करण्यात येणार आहे.  जर्मनीतील तंत्रज्ञानाचा वापर करून साळगाव पठारावर विक्रमी वेळेत तयार करुन दिड वर्षापूर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या या प्रकल्पात सुरुवातीला दिवसा ५० टन कचऱअयावर प्रक्रिया करण्यात येत होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रकल्पाच्या कामाला शुभारंभ झालेला. तसेच त्यावर १४६ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले. आता दिड वषार्नंतर दिवसाला १२५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असून पुढील महिन्याभरात ती वाढवून २०० टन प्रती दिन करण्यात येणार असल्याची माहिती घन कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो यांनी दिली. 

म्हापसा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून देशातील अनेक राज्यांच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाची पहाणी केली आहे. सध्या या प्रकल्पातून तयार होणाऱ्या बायोगॅस इंधनाचा वापर बसगाड्यांसाठी प्रायोगीक तत्वावर करण्यात येत आहे. कदंब महामंडळाने स्वीडनच्या स्कॅनिया या कंपनीशी हातमिळवणी करुन देशातील पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम येथील इंधन वापरुन ऑगस्ट महिन्यात सुरु केला होता. 

प्रकल्पाची क्षमता वाढवण्यापूर्वी त्याचे पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यात येणार असून परवानगी मिळाल्यानंतर क्षमता वाढवण्यात येणार आहे. सध्या प्रकल्पात एकाच पाळीवर कामगार काम करतात. ती वाढवून दिवसाला दिड पाळीवर काम करण्यात येणार असल्याची माहिती लोबो यांनी दिली.  या प्रकल्पामुळे उत्तर गोव्यातील किनारी भागातल्या कचरा प्रश्नावर तोडगा काढणे शक्य झाले आहे. किनाऱ्यावरील बऱ्याच भागात कचऱ्याची समस्या दूर झाली असली तरी काही ठिकाणी सुविधांच्या अभावी कचरा व्यवस्थित गोळा केला जात नसल्याचे ते म्हणाले. काही पंचायतींना सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच कचºयाच्या वर्गीकरणा संबंधी जागृती होणे आवश्यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. 

उत्तर गोव्यासाठी अशा प्रकारच्या आणखीन एका प्रकल्पाची गरज आहे. हा प्रकल्प झाल्यास उत्तर गोव्यातील कचºयाची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. राजधानी पणजीपासून जवळ असलेल्या बायंगिणी येथे नवीन प्रकल्प बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे तिसवाडी तालुक्यातील कचºयाची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती मायकल लोबो यांनी दिली.  

टॅग्स :goaगोवा