साकवाळ- झुआरीनगर येथे ५६ वर्षीय इसमाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 09:01 PM2021-12-12T21:01:24+5:302021-12-12T21:01:33+5:30

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी उत्तररात्रीनंतर १२.३० च्या सुमारास या खून प्रकरणाची माहीती उघड झाली.

Sakwal: Murder of 56 year old Isma at Zuarinagar | साकवाळ- झुआरीनगर येथे ५६ वर्षीय इसमाचा खून

साकवाळ- झुआरीनगर येथे ५६ वर्षीय इसमाचा खून

Next

वास्को: दक्षिण गोव्यातील साकवाळ, झुआरीनगर येथे राहणारा अन्वर शेख (वय ५६) शनिवारी उत्तररात्री जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ््यात पडल्याने त्याला त्वरित उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळा नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. झुआरीनगर येथील एका अंतर्गत रस्त्यावर अन्वर च्या कपाळावर अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याने त्याच्या कपाळाच्या उजव्या आणि दाव्या बाजूत तीक्ष्ण जखमा झाल्याचे पोलीसांना तपासणीवेळी दिसून आले. वेर्णा पोलीसांनी अन्वर शेखचा खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्याच्या हत्येमागे असलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी उत्तररात्रीनंतर १२.३० च्या सुमारास या खून प्रकरणाची माहीती उघड झाली. अन्वर शेख ज्या ठिकाणी जखमी अवस्थेत सापडला होता त्याच्या जवळच असलेल्या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये तो भाड्याने रहायचा. तो पूर्वी एमपीटी (मुरगाव बंदर) मध्ये मेकानिकल विभागात कामाला असून २०१२ सालात त्यांनी स्वइच्छा सेवानिवृत्ती घेतली होती अशी माहीती पोलीसांनी दिली. अन्वर पूर्वी इस्लांम्पूर, बायणा येथील रहीवाशी असून त्याची एक चांगला गायक म्हणूनही ओखळ आहे.

सद्या झुआरीनगर येथे राहणारा अन्वर शनिवारी उत्तररात्री तेथील एका अंतर्गत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ््यात पडल्याचे कोणाला दिसून येताच त्यांनी त्वरित १०८ रुग्णवाहीकेला माहीती दिली. १०८ रुग्णवाहीकेने त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन गंभीर जखमी झालेल्या अन्वरला त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेले, मात्र येथे आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने घोषित केले.

पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन लोकांशी चौकशी करण्याबरोबरच अन्वर रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या जागेची पाहणी केली. तसेच त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो शवचिकीत्सेसाठी शवगृहात पाठवून दिला. रविवारी (दि.१२) सकाळी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया, मुरगावचा अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक म्हणून ताबा असलेले धर्मेश आंगले, वेर्णा पोलीस निरीक्षक प्रशल देसाई आणि पोलीस पथकाने घटनास्थळावर येऊन चौकशी करून खूनाबाबतचे काही पुरावे मिळतात काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

ज्या ठिकाणी अन्वर रक्ताच्या थारोळ््यात पडला होता त्याच्या जवळच असलेल्या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये तो आपल्या पत्नीसहीत भाड्याने राहायचा अशी माहीती पोलीसांना चौकशीत मिळाली आहे. सुमारे आठ दिवसापूर्वी अन्वरची पत्नी तिच्या बहीणीच्या घरी गेली असून सद्या तो फ्लॅटमध्ये एकटाच रहायचा असे चौकशीत कळाले आहे. अन्वरच्या कपाळावर उजव्या आणि दाव्या बाजूला तीक्ष्ण जखमा झालेल्या असून यामुळेच रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज सद्या पोलीसांकडून व्यक्त केला जात आहे.

अन्वरचा खून कोणी केला आणि कशासाठी केला याबाबत अजून पोलीसांना कुठल्याच प्रकारचा सुराग हाती लागलेली नसल्याची माहीती सूत्रांनी दिली. ज्या ठीकाणी अन्वर जखमी अवस्थेत पडला होता तेथे काही तासापूर्वी तो एका अज्ञात व्यक्तीशी बोलत होता अशी माहीती पोलीसांना चौकशीवेळी मिळालेली आहे. मात्र अन्वरशी रात्री त्या ठीकाणी बोलत असलेला तो व्यक्ती कोण त्याबाबत पोलीसांना अजून कुठलीच माहीती मिळालेली नाही. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

वेर्णा पोलीस हद्दीतील भागात पाच दिवसात दुसरा खून

वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीत पाच दिवसात हे दुसरे खून प्रकरण नोंद झाले आहे. ७ डीसेंबरला उत्तररात्रीनंतर आंद्राप्रदेश येथून गोव्यात काम शोधण्यासाठी आलेल्या २७ वर्षीय ताहीर हुसेंन मुल्ला याच्या हातातून नुवे येथे राहणाºया संजीव बोजगर याचा खून घडल्याचे उघड झाले होते. ताहीरशी गोव्यात नोकरी नसल्याने तो काही दिवसापासून वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या समोरील रस्त्यावर असलेल्या ‘सबवे’ च्या पायºयांवर झोपायचा.

मंगळवारी उत्तररात्रीनंतर नुवे येथील संजीव बोजगर त्याठीकाणी पोचल्यानंतर कीरकोळ विषयावरून दोघात वाद निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण मारामारीत बदलले तेव्हा ताहीर ने संजीवला धक्का दिला असता तो पायºयांवरून खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखमा होऊन नंतर त्याचा मृत्यू झाला. पोलीसांनी संजीव बोजगर (वय ५०) खून प्रकरणात तेव्हा त्वरित कारवाई करून ताहीर विरूद्ध भादस ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली होती. पाच दिवसानंतर वेर्णा पोलीस हद्दीत अनवर याचे हे दुसरे खून प्रकरण नोंद झाले असून या प्रकरणातील आरोपीला वेर्णा पोलीस कधी गजाआड करतील हे येणाºया दिवसातच स्पष्ट होईल.

Web Title: Sakwal: Murder of 56 year old Isma at Zuarinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा