लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण: चार रस्ता काणकोण येथील मल्लिकार्जुन विद्यालयातील 'कला, क्रीडा आंगण' या बहुउदेशिय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारतरत्न तथा प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता होणाऱ्या य सोहळ्याला ज्ञान प्रबोधनी मंडळाचे अध्यक्ष चेतन मंजू देसाई, शिक्षण संचालक शैलेश सिनाई झिंगडे, बीसीसीआयचे संयुक्त सचिव रोहन गावस देसाई, डॉ. अजित देसाई, मल्लिकार्जुन देवालयाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, संस्थेच्या आमसभेचे अध्यक्ष शांबा नाईक-गावकर, संस्थेचे अध्यक्ष बाबुसो नाईक-गावकर, शंभा नाईक-देसाई उपस्थित राहणार आहेत.