शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुंजणार ‘रुबीगुला’चा स्वर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 01:27 IST

देशातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजन समितीने वेग धरला असून त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धेचे बोधचिन्ह आणि स्पर्धा गीत याची निवडही करण्यात आली आहे.

- सचिन कोरडे पणजी : देशातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजन समितीने वेग धरला असून त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धेचे बोधचिन्ह आणि स्पर्धा गीत याची निवडही करण्यात आली आहे. राज्य पक्षी असलेल्या बुलबुल (रुबीगुला) याची बोधचिन्ह म्हणून निवड करण्यात आली. २० डिसेंबर रोजी एका पंचतारांकित हॉटेलात हा अनावरण सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयोजकांकडून मात्र याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.गोव्यात होणारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे या स्पर्धेची अधिक चर्चा रंगत आहे. शिवाय स्पर्धेसाठी सुरू असलेल्या तयारीचा संथ वेग पाहता अजूनही संशयास्पद वातावरण आहे. परंतु, स्पर्धेच्या आयोजन समितीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विडा उचलला असून त्या दृष्टीने तयारीचा वेग वाढवला आहे. गोव्यात ही स्पर्धा ३० मार्च ते ४ एप्रिल २०१९ दरम्यान होत आहे. नुकतीच स्पर्धेची तांत्रिक समिती पाहणी करून गेली. त्यांनी तयारीचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला होता. फेब्रुवारीपर्यंत सर्व कामे आटोपून घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. अशा स्थितीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे बोधचिन्ह व स्पर्धा गीताचे होणारे अनावरण कुठेतरी दिलासा देणारे ठरेल. मात्र, याबाबत स्पर्धेच्या आयोजन समितीला, अधिकाऱ्यांनाही फारशी माहिती नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.यासंदर्भात, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे संयुक्त सीईओ व्ही. एम. प्रभुदेसाई म्हणाले, ‘आम्ही २० डिसेंबरला बोधचिन्हाचे अनावरण करीत आहोत. हा कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा याबाबत आम्ही शासनदरबारी चर्चा करीत असून याविषयी अधिकृतरीत्या कळविले जाईल.’

टॅग्स :goaगोवा