शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या '१२0 बीपीएम'ने पटकाविला सुवर्णमयूर, चीनचे वुईवून कू ठरले उत्कृष्ट दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 19:59 IST

मोरोक्क्को येथे जन्मलेल्या फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या १२0 बीटस पर मिनिट या चित्रपटाने गोवा येथील ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णमयूर पटकाविला.

ठळक मुद्देरॉबिन कॅम्पिल्लो यांच्या १२0 बीटस पर मिनिट या चित्रपटाने पटकाविला सुवर्णमयूर चीनचे दिग्दर्शक वुईवून कू यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारनेहूल पर्झ बिस्कार्त यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

- संदीप आडनाईक

पणजी : मोरोक्क्को येथे जन्मलेल्या फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या १२0 बीटस पर मिनिट या चित्रपटाने गोवा येथील ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णमयूर पटकाविला. चीनचे दिग्दर्शक वुईवून कू यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा, नेहूल पर्झ बिस्कार्त यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा तर केरळच्या पार्वती टी. के. यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

गोव्यातील बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात झालेल्या रंगारंग सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. या समारंभानंतर इफ्फीचा गेले आठ दिवस सुरु असलेल्या चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. या सोहळ्यात टेक आॅफ या चित्रपटासाठी स्पेशल ज्युरी पुरस्कार देण्यात आले. तर डार्क स्खूल या चित्रपटासाठी बोलिव्हियन दिग्दर्शक किरो रुसो यांना रुपेरी मयूर पुरस्कार देण्यात आला. मनोज कदाम्ह यांना क्षितिज या मराठी चित्रपटासाठी जेएसएफटी युनेस्को गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय इफ्फी २0१७ च्या जीवनगौरव पुरस्काराने कॅनडाच्या अटोम इग्वोयन यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

सुवर्णमयूर स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि सुवर्णमयूर पुरस्काराची रोख ४0 लाख रुपयांची रक्कम निर्माता आणि दिग्दर्शक यांना विभागून देण्यात आली. उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी रुपेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि १५ लाख रुपये रोख देण्यात आले. उत्कृष्ट अभिनेते आणि अभिनेत्रीसाठी रुपेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि रोख १0 लाख रुपयांची रक्कम  देण्यात आली. स्पेशल ज्युरी अ‍ॅवार्डसाठी १५ लाख रुपये रोख आणि चंदेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर उत्कृष्ट चित्रपटांचा चंदेरीमयूर पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी १0 लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे स्वरुप आहे. 

 

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017