शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मडगावातील व्यापाऱ्याच्या घरात चोरी प्रकरणी महिला ताब्यात; 60 लाखांचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:53 IST

सिल्वर फॉईलमध्ये लपवून ठेवलेले दागिने जप्त

मडगाव: मडगावातील प्रसिद्ध व्यापारी असलेले दास नाईक यांच्या आगाळी - फातोर्डा येथील बंगल्यात शिरुन सुमारे 60 लाखाचे दागिने आणि रोख रक्कम पळविल्याच्या गुन्हय़ाखाली फातोर्डा पोलिसांनी शांतीनगर-रावणफोंड येथील सिल्वीना फर्नाडिस या महिलेला अटक करुन तिच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केला आहे. सदर दागिने या संशयित महिलेने एका सिल्वर फॉईलमध्ये बांधून बोर्डा येथील आपल्या आईच्या घरी लपवून ठेवले होते अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

या प्रकरणात नाईक यांच्या बंगल्याच्या वरच्या बाजूला भाडेकरु म्हणून रहाणारे मनोहर प्रभूदेसाई व त्याची पत्नी लीना प्रभूदेसाई यांचाही हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पोलिसांनी या दाम्पत्याच्या मालकीची एक स्कुटरही जप्त केली आहे. या प्रकरणात आपल्याला अटक होईल या भीतीने या संशयित दाम्पत्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून या प्रकरणात तक्रारदार नाईक यांच्यावतीने अॅड. राजीव गोमीस यांनी तक्रारदाराचीही बाजू ऐकून घेण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. सदर दाम्पत्य सध्या फरारी आहे.

फातोर्डा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, 27 मार्च रोजी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली होती. आगाळी येथील सेंट अँथनी कम्युनिटी हॉलच्या मागे असलेल्या नाईक यांच्या बंगल्यात सदर संशयित मागच्याबाजूने आत शिरली. यावेळी नाईक यांचा मुलगा बाथरुममध्ये आंघोळ करत होता. त्यामुळे घराचे मागचे दार उघडे होते. याच उघडय़ा दारातून संशयित महिलेने आत येऊन सुमारे 60 ते 65 लाखांचे सोन्याचे दागिने तसेच सुमारे दोन लाखांचे देशी व विदेशी चलन चोरुन नेले.या प्रकरणात त्या संशयित महिलेला 1 एप्रिल रोजी संशयावरुन अटक केली होती. मात्र तब्बल दोन दिवस तिने आपले तोंड न उघडल्याने या चोरीचा छडा लागू शकला नव्हता. शेवटी बुधवारी तिने आपले तोंड उघडले. चोरलेले सामान आपण प्रभुदेसाई याच्या मदतीने त्याच्या स्कुटरवरुन दुसरीकडे नेऊन ठेवल्याचेही तिने तपासाच्यावेळी पोलिसांना सांगितल्यामुळे पोलिसांनी प्रभूदेसाई यांच्या मालकीची स्कुटर जप्त केली.

या प्रकरणात मडगावचे पोलीस उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली फातोडर्य़ाचे निरीक्षक सलीम शेख, उपनिरीक्षक अनंत गावकर, साईल वारंग, महिला उपनिरीक्षक सुमेधा नाईक, पोलीस शिपाई रोहन नाईक, सुधीर तळेकर, महिला पोलीस शिपाई अनिता राणो, प्रियांका, शैनाज देसाई व इतर कर्मचा:यांनी भाग घेतला. 

टॅग्स :Robberyदरोडाgoaगोवा