शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांची गर्जना; विविध समाज गट अधिक सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 08:52 IST

लोकप्रतिनिधी खूप जबाबदार असावे लागतात.

अलीकडे विविध समाज गट गोव्यात अधिक सक्रिय होऊ लागले आहेत. आपल्या जातीचे, समाजाचे अधिकाधिक उमेदवार निवडून येऊन विधानसभेत पोहोचायला हवेत, असे राजकारण्यांना वाटतेच, शिवाय लोकांमधीलही एका वर्गाला तसेच वाटू लागले आहे. कुंभारजुवे मतदारसंघातील भाजपचे आमदार राजेश फळदेसाई हे अतिउत्साही राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी गोव्यात क्षत्रिय मराठा समाजातील आमदारांचा आकडा सातवरून चौदापर्यंत वाढू शकतो, असे विधान परवा केले. यापूर्वी मराठा समाजातील कोणत्याच आमदाराने कधी असे धाडस केले नव्हते. फळदेसाई जे काही बोलले ते फार गंभीरपणे घ्यावे अशी स्थिती नाही. तरीदेखील सत्ताधारी भाजपचा आमदार असे विधान करतो तेव्हा त्यावर थोडा ऊहापोह व्हायला हवा. 

लोकप्रतिनिधी खूप जबाबदार असावे लागतात. गोव्याला गेल्या वीस वर्षांत काही लोकप्रतिनिधी काहीसे उथळ लाभले. पूर्वी मिकी पारोको, बाबूश मोन्सेरात वगैरे वाट्टेल ती विधाने करायचे मग बाबू आजगावकरांसारखे राजकारणीही मागचापुढचा विचार न करता बोलू लागले. पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना कॅबिनेट बैठकीत एका मंत्र्याने दुसऱ्या ज्येष्ठ मंत्र्याला चक्क शिवीगाळ केली होती. पर्रीकर तेव्हा खूप आजारी, त्यामुळे हबतल, असाहाय्य होऊन गप्प राहिले होते. फळदेसाई तसे आमदार मुळीच नाहीत. मात्र उत्साहाच्या भरात काहीवेळा जे काही बोलून जातात, ते जबाबदार लोकप्रतिनिधींच्या परंपरेस धरून नाही. कुंभारजुवेतही एक सनबर्न व्हायला हवा, अशी अपेक्षा काही महिन्यांपूर्वी फळदेसाई यांनी सरकारी कार्यक्रमावेळी व्यक्त केली होती. त्यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे व्यासपीठावर होते. 

किनारी भागात होणारा सनबर्न महोत्सव आपल्या मतदारसंघातही व्हावा, छोटा तरी सनबर्न हवाच, असे विधान त्यांनी केले होते. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर फळदेसाई भाजपमध्ये जाण्यास उतावीळ झाले होते. शेवटी त्यांनी भाजपमध्ये उडी टाकलीच. कदाचित पुढे ते भाजपला जड होऊ शकतात, असे त्यांच्या विधानांवरून कधी कधी वाटू लागते. आमदारांना आपल्या समाजाच्या पलीकडे जाऊनही विचार करावा. लागतो, हे भविष्यात अनुभवाअंती फळदेसाई यांना कळून येईलच. विद्यमान मुख्यमंत्री सावंत हे परिपक्व आहेत. ते कधी असे बोलत नाहीत. ही परिपक्वता फळदेसाई यांनाही दाखवावी लागेल. क्षत्रिय मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच झाला. फळदेसाई त्यावेळी म्हणाले की, क्षत्रिय मराठा समाजबांधवांची प्रगती होत आहे. 

भविष्यात या समाजातील आमदारांचा आकडा सातवरून चौदापर्यंत पोहोचेल. फळदेसाई यांनी हा निष्कर्ष काढण्यापूर्वी खूप विचार केलाय किंवा अभ्यास केलाय असे वाटत नाही. यापूर्वी मराठा समाजातीलच प्रतापसिंह राणे, पार्सेकर आदी अनेकांनी मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. विद्यमान मुख्यमंत्रीही मराठा समाजातीलच आहेत. मात्र, चाळीस सदस्यीय विधानसभेत मराठा आमदारांची संख्या सातवरून चौदापर्यंत पोहोचेल, अशा अर्थाचे विधान कधी राणे, पार्सेकर यांनीही केले नव्हते किंवा सावंत यांनीही केले नाही. विधान करायलाही हरकत नाही, पण मराठा समाजातील आमदारांची संख्या वाढविण्यासाठी तुम्ही स्वतः कोणते योगदान देत आहात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की मराठा समाजातील किंवा कुण्या एका समाजातील आमदारांची संख्या वाढवून नेमके काय साध्य केले जाणार आहे? 

गोव्याला चांगले, कार्यक्षम, सुशिक्षित आमदार हवे आहेत. मग ते कोणत्याही समाजातील असो, मराठा समाजाविषयी सर्वांनाच अभिमान आहे, आपुलकी आहे. कारण गोवा मुक्तिसंग्रामातदेखील या समाजाने इतरांप्रमाणेच लक्षणीय योगदान दिले आहे. मात्र, आजचा काळ वेगळा आहे. अमक्याच एका समाजाचे आमदार दुप्पट होतील असे बोलण्यासारखी स्थिती आज राहिलेली नाही. तसे झाले तर मग भंडारी समाज, खारवी समाज वगैरे विविध समाजातील आमदार म्हणू लागतील की, आमच्याच समाजातील आमदारांची संख्या वाढावी. तसे केल्याने भेदाभेद वाढू शकतो. हा धोका येथे अधोरेखित करावा एवढाच हेतू आहे. बाकी फळदेसाई यांनी बोलून गुन्हा केला असे कुणीच म्हणत नाही व म्हणणारही नाही.

 

टॅग्स :goaगोवाmarathaमराठा