शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
5
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
6
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
7
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
8
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
9
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
10
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
11
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
12
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
13
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
14
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
15
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
16
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
17
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
18
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
19
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
20
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण

मुसळधार पावसामुळे गोव्यात नद्यांना पूर; वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 18:55 IST

चंद्रनाथ पर्वतावर विद्यार्थी अडकले

मडगाव: गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पारोडा—केपे येथील कुशावती नदीला पूर आल्याने पर्वत पारोड्याजवळील रस्ता पाण्याखाली गेला. यामुळे मडगाव—सांगे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. यंदा या नदीला सहाव्यांदा पूर आला असून अलिकडच्या काळातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.कुशावती नदीचे पाणी वाढल्याने सकाळी 10 च्या सुमारास हा रस्ता पाण्याखाली गेला. यामुळे या रस्त्यावरुन जाणारी वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली. मात्र चांदर येथेही एक वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक अडून उरली. सायंकाळी उशिरापर्यंत हा रस्ता पाण्याखाली असल्याने या मार्गावरील पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती.वादळी वाऱ्याने चंद्रेश्र्वर पर्वतावरील रस्त्यावर एक झाड उन्मळून पडल्याने विद्यार्थ्यांचा एक गट पर्वतावरच अडकून पडण्याची घटना घडली. चंद्रेश्र्वर पर्वतावर पणजीतील एका विद्यालयाचे एनएसएस शिबीर आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी हे विद्यार्थी पुन्हा आपल्या घरी जाणार होते. मात्र वाटेत झाड उन्मळून पडल्याने ते अडकले. शेवटी मडगावच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी हे झाड कापून विद्यार्थ्यांना रस्ता मोकळा करुन दिला. केपे परिसरात कुशावतीचे पाणी वाढल्याने दत्त मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत नदीचे पाणी पोहोचले होते.

रस्ते पाण्याखाली; झाडे कोसळण्याच्याही घटनाधुवांधार पावसाने शुक्रवारी संपूर्ण सासष्टी तालुक्याला झोडपून काढले. पावसाबरोबरच आलेल्या वादळी वा:यामुळे या तालुक्यात 50 पेक्षा जास्त ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून ही झाडे कापून मार्ग मोकळे करण्यासाठी संपूर्ण दिवस अग्नीशमन दलाचे जवान व्यस्त होते. विशेषत: किनारपट्टी भागात झाडे पडण्याच्या घटना अधिक घडल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिली.गुरुवारी रात्रीपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी मडगावातही रस्त्यावर पाणी आले होते. मडगाव पालिकेसमोर पाणी साचल्याने पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. विद्यानगर भागात शुक्रवारी सकाळी एक वृक्ष उन्मळून पडल्याने दोन स्कूटरचे किरकोळ नुकसान झाले अशी माहिती स्थानिक नगरसेविका सुगंधा बांदेकर यांनी दिली. त्या म्हणाल्या, या भागात धोकादायक स्थितीत असलेले हे झाड सकाळी उन्मळून पडले. नशिबाची बाब म्हणजे नेहमी या जागेत दोन कार पार्क करुन ठेवल्या जातात. मात्र त्यापैकी एक गाडी पार्क केली नव्हती तर दुसरी गाडी झाड पडण्याच्या पाच मिनटापूर्वीच तेथून हटविल्याने मोठा अनर्थ टळला असे त्या म्हणाल्या. या भागात आणखीही धोकादायक स्थितीत झाडे आहेत ती लवकर हटवावीत अशी मागणीही त्यांनी केली.

बेपत्ता खलाशाचा शोध चालूचमोबोर—बेतूल येथे गुरुवारी मच्छीमारी होडी फुटून झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेला वासू नावाचा तांडेल शुक्रवारीही सापडला नाही. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतानाही तटरक्षक दलाकडून त्याचा शोध घेणो चालू होते. गुरुवारच्या या दुर्घटनेत एकूण पाचजण पाण्यात फेकले गेले होते. त्यातील चारजणांना सुरळीतपणे काठावर आणले. मात्र होडीचा तांडेल लाटाबरोबर बेपत्ता झाला होता. शुक्रवारी संपूर्ण समुद्र खवळून निघाल्याने मच्छीमारी होड्या काठावर ठेवणोच पसंत केले. लाटांच्या तडाख्याने दक्षिण गोव्यातील कित्येक किनारपट्टींची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस