शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषय लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 20:18 IST

शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषय लागू करण्याचा तसेच 2020पर्यंत रस्ता अपघात निम्म्यावर आणण्यासाठी युद्धपातळीवर कृती योजना तयार करण्याचा निर्णय सोमवारी रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

पणजी : शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषय लागू करण्याचा तसेच 2020पर्यंत रस्ता अपघात निम्म्यावर आणण्यासाठी युद्धपातळीवर कृती योजना तयार करण्याचा निर्णय सोमवारी रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम शिक्षण खात्याकडून चालू आहे. एससीईआरटीने मसुदा तयार केला आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस तसेच तज्ज्ञांकडून सल्ला घेण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा विषय लागू होणार आहे. वाहतूक नियमांचा भंग करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे तसेच रस्ता सुरक्षा विषयक नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत, याची खबरदारी घेण्याचे ठरले.वाढत्या रस्ता अपघातांबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. इंटरसेप्टर्स, अल्कोमीटर आदी उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्यांवर ज्या ज्या ठिकाणी दिशाफलक किंवा इतर गोष्टींची आवश्यकता त्याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला सांगण्यात आले आहे.महत्त्वाच्या तसेच शहरांमधील रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे पेंटिंग केले जाईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून आर्थिक साहाय्य घेऊन उत्तर आणि दक्षिण गोव्यात आवश्यक त्या ठिकाणी ट्रॉमा युनिट उघडण्याच्या बाबतीत आरोग्य खात्याकडूनही प्रस्ताव मागविला आहे.रस्त्यावरील भटक्या गुरांमुळे वाहनधारकांना निर्माण झालेल्या धोका यावरही चर्चा करण्यात आली. भटक्या गुरांना पकडून त्यांची कोंडवाड्यात रवानगी करण्याचेही बैठकीत ठरले. वेगवेगळ्या घटकांना सोबत घेऊन रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. वाहतूक खाते, पोलीस दल, आरोग्य खाते, सार्वजनक बांधकाम खाते यांच्या संयुक्त विद्यमाने चालू महिनाअखेर रस्ता सुरक्षा सप्ताह होणार आहे.

टॅग्स :goaगोवा