लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रो-रो फेरीबोटीने चारचाकीने प्रवास करणाऱ्या चोडणच्या नागरिकांना आता ३० रुपयांऐवजी १० रुपये शुल्क भरावा लागणार आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत १० रुपये शुल्क आकारणीचा पास जारी केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.
आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानकावर चोडणच्या नागरिकांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. रायबंदर ते चोडण या जलमार्गावर अतिरिक्त फेरीबोटी तैनात केल्यातील असेही त्यांनी सांगितले. या बैठकीतला मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते.
रायबंदर ते चोडण या जलमार्गावर सध्या दोन व्दारलका व गंगोत्री या दोन रो रो फेरीबोटी तैनात आहेत. सध्या त्यातून प्रवास करण्यासाठी चारचाकी वाहनांकडून तिकीट म्हणून ३० रुपये आकारले जातात. रोज त्यातून प्रवास करणाऱ्या चोडणवासीयांना यामुळे आर्थिक फटका बसत असल्याने तिकीट १० रुपये करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानुसार यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. यावेळी चोडणच्या नागरिकांना पुढील आठ ते दहा दिवसांत १० रुपये शुल्क आकारणीचा पास जारी करण्याचे आश्वासन त्यांना दिले.
रायबंदर ते चोडण या जलमार्गावर अतिरिक्त फेरीबोटी तैनात करणार. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिरिक्त फेरीबोटी. दर दिवशी ४०० चारचाकी वाहने करताना रो-रो व फेरीबोटींनी प्रवास. प्रत्यक्षात चोडणच्या नागरिकांच्या केवळ ५० चारचाकी
बाहेरील नागरिकांना ३० रुपये तिकीट
सदर पास हा केवळ चोडणच्या नागरिकांसाठीच असेल. पास काढण्यासाठी नदी व परिवहन खात्याचा काऊंटर चोडण येथे स्थापन केला जाईल. चोडणच्या बाहेरील नागरिकांना मात्र चारचाकीने प्रवास करण्यासाठी ३० रुपये इतकीच तिकीट द्यावी लागेल, असेही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.