शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील जगप्रसिद्ध फेस्तावेळी धोका संभवतो, चर्चकडून शक्यता व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 19:50 IST

राज्यात आता लवकरच सुरू होणार असलेल्या जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्यावेळी धोका संभवतो, अशी भीती जुनेगोवे येथील बॉम जीझस बेसिलिका ह्या चर्चशी निगडीत धर्मगुरुंनी पुरातत्त्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याशी सोमवारी झालेल्या बैठकीवेळी व्यक्त केली.

पणजी : राज्यात आता लवकरच सुरू होणार असलेल्या जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्यावेळी धोका संभवतो, अशी भीती जुनेगोवे येथील बॉम जीझस बेसिलिका ह्या चर्चशी निगडीत धर्मगुरुंनी पुरातत्त्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याशी सोमवारी झालेल्या बैठकीवेळी व्यक्त केली. यासाठी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने आपण गृह मंत्री तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करीन, अशी ग्वाही मंत्री सरदेसाई यांनी ख्रिस्ती धर्मगुरुंना दिली.फेस्ताच्या ठिकाणी जगभरातून भाविक येत असतात. लाखोंच्या गर्दीमुळे धोका संभवतो, अशी शक्यता धर्मगुरुंनी व्यक्त केल्यानंतर मंत्री सरदेसाई यांनी हा विषय आपल्या खात्याच्या अखत्यारित येत नाही पण आपण मुख्यमंत्र्यांशी बोलेन असे सांगितले. फेस्ताच्या ठिकाणी येण्यासाठी व जाण्यासाठी असलेल्या मार्गाची संख्या कमी करायला हवी, या दृष्टीने विचार करता येईल पण एकदमच संख्या कमी केली तर, चेंगराचेंगरीही होऊ नये म्हणूनही काळजी घ्यावी लागेल, असे मंत्री सरदेसाई बैठकीनंतर बोलताना म्हणाले.जुनेगोवे येथे ज्या जगप्रसिद्ध चर्चेस आहेत, त्या चर्च इमारतींच्या मधून पणजी- फोंडा हा मुख्य रस्ता (जुनेगोवेमार्गे) जातो. दोन्ही चर्चमधून हा रस्ता गांधी सर्कलकडे जातो. हा रस्ता दैनंदिन वाहतुकीसाठी कायमचा बंद करावा व रोज होणारी वाहतूक ही दुस:या मार्गाने वळवावी, अशीही मागणी ािस्ती धर्मगुरुंनी केली. या मागणीवर सरकार विचार करील, असे मंत्री सरदेसाई म्हणाले. या रस्त्यावरील वाहतुकीवर र्निबध लागू करता येतील. फक्त अतिमहनीय व्यक्ती वगैरे जेव्हा प्रवास करत असतात, त्यावेळीच रस्ता खुला करण्याच्यादृष्टीने विचार करता येईल, असे सरदेसाई म्हणाले.जुनेगोवे येथे जवळच सेंट पॉल कॉलेजजवळ असलेल्या एका चॅपेलचे दुरुस्ती कामही आपले खाते लवकरच करून देईल. तसेच अन्य समस्या सोडविल्या जातील, असे मंत्री सरदेसाई यांनी लोकमतला सांगितले.नोव्हेना 25 पासूनदरम्यान, सेंट झेवियर फेस्त हे गोंयच्या सायबाचे फेस्त म्हणून ओळखले जाते. देश-विदेशात स्थायिक झालेले ख्रिस्ती धर्मिय बांधव फेस्तानिमित्ताने गोव्यात येतात. फेस्त 4 डिसेंबर रोजी होईल. तथापि, तत्पूर्वी येत्या दि. 25 पासून नोव्हेना म्हणजेच पहाटेच्या प्रार्थना जुनेगोवे येथील चर्चमध्ये सुरू होणार आहेत. 

टॅग्स :goaगोवा