शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

तूर्त लोकसभेसाठी भूमिका नाही: वेलिंगकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 23:07 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच पक्ष या लोकसभा निवडणुकीत कोणतीही भूमिका घेणार नाही.

- वासुदेव पागीपणजी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच पक्ष या लोकसभा निवडणुकीत कोणतीही भूमिका घेणार नाही. कुणाला मतदान करावे व कुणाला करू नये याचा निर्णय लोकांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून घ्यायचा आहे, असे वेलिंगकर यांनी म्हटले आहे.गोवा सुरक्षा मंच लोकसभा निवडणुकीत रिंगणात नाही, परंतु तिन्ही मतदारसंघात होऊ घातलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हा पक्ष उतरला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत हा पक्ष नेमकी कोणती भूमिका बजावील, असे विचारले असता वेलिंगकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार ठेवलेले नाहीत. त्यामुळे भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. लोकांनीच आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून निर्णय घ्यायचा आहे.विधानसभेच्या पोटनिवडणुका असल्यामुळे सर्व शक्ती ही त्यासाठी वापरली जाणार आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करून दाखविली जाणार आहे. तसेच इतर सर्व मतदारसंघातही मंचाचे काम करायचे आहे. त्यासाठी पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम केले जाणार आहे असेही त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. गोवा भाजपशी थेट लढा पुकारलेल्या या पक्षाने केंद्रात मात्र नरेंद्र मोदी सरकारच यावे असेही मागे म्हटले होते. शिवाय उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे गोवा सुरक्षा मंचातील कार्यकर्ते व नेते यांच्याशी चांगले संबंध आहेत. प्राथमिक शिक्षमाचे माद्यम मुद्यावर त्यांनी वेलिंगकर यांची भुमिका योग्य असल्याचेही अनेकवेळा जाहीररित्या म्हटले होते. त्यामुळे गोसुमची नाईक यांच्या बाबतीत काय भूमिका राहील या बाबत लोकांत उत्सुकताही होती. वेलिंगकर यांनी माद्यमाच्या मुद्यावरून भाजप सरकारशी लढा पुकारल्यानंतर संघाने त्यांना संघचालकपदावरून हटविले होते.