शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेतले तरच योग्य भवितव्य : मगोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 12:56 IST

गोव्यात देखील भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व मगो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.

ठळक मुद्देभाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया दिपक ढवळीकर यांनी व्यक्त केली.गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचे मगोप आणि गोवा फॉरवर्ड हे दोन प्रमुख घटक आहेत. गोवा विधानसभा सध्या 38 सदस्यीय असून या दोन्ही पक्षांकडे एकूण सहा आमदार आहेत.

पणजी - देशातील पाचपैकी दोन-तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला जी स्थिती आली, ते पाहता भाजपाने सत्तेतील घटक पक्षांना विश्वासात घेणे गरजेचे आहे हे स्पष्ट होते. गोव्यात देखील भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व मगो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचे मगोप आणि गोवा फॉरवर्ड हे दोन प्रमुख घटक आहेत. गोवा विधानसभा सध्या 38 सदस्यीय असून या दोन्ही पक्षांकडे एकूण सहा आमदार आहेत. भाजपाकडे चौदा व काँग्रेसकडेही चौदा आमदार आहेत. तिघे अपक्ष आहेत व त्या तीन अपक्षांपैकी दोन जण सध्या सरकारवर खूप नाराज आहेत. ते प्रशासन ठप्प झाल्याची टीकाही जाहीरपणे करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे तूर्त काँग्रेसच्याबाजूने आहेत. गोव्यातील मगो पक्षाने यापूर्वी भाजपावरील दबाव वाढवला होता. मुख्यमंत्री आजारी असल्याने व ते घराबाहेर पडू शकत नसल्याने मुख्यमंत्रीपदाचा ताबा मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सोपविला जावा, अशी मागणी मगो पक्षाने यापूर्वी सातत्याने केली होती. खनिज खाणी जर 15 डिसेंबपर्यंत सुरू झाल्या नाही तर मगोपला वेगळा विचार करावा लागेल असाही इशारा मगोपने दिला होता.

दोन-तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला जी स्थिती आली, त्याविषयी लोकमतने प्रतिक्रिया विचारताच अध्यक्ष दिपक ढवळीकर म्हणाले, की गोव्यातही घटक पक्षांना भाजपाने विश्वासात घेतले नाही तर ते मुळीच योग्य होणार नाही असा संदेश देशभरातील वातावरणामधून मिळत आहे. भाजपाने मनमानी कारभार बंद करावा. सरकार चांगल्या प्रकारे चालण्यासाठी भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घ्यावे, तरच चांगले भवितव्य आहे हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. मी जे काही बोलत होतो ते योग्य होते हेही आता कळून येत आहे. लोकांना गृहित धरता येत नाही.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकरPoliticsराजकारण