शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून एसटी समाजाचा मतांसाठी वापर, आरजीचे मनोज परब यांचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 16:00 IST

अद्यापही आरक्षणाचं आश्वासन पूर्ण केला नसल्याचा परब यांचा आरोप.

नारायण गावसपणजी: भाजप एसटी समाजाचा फक्त मतांसाठी वापर करत आहे. सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात सर्व शिष्टमंडळाला दिल्लीत नेऊन एसटी आरक्षणावर केंद्रातील नेत्यांची भेट घेणार असे आश्वासन दिले होते. पण अजू्न ते पूर्ण झालेले नाही. भाजप एसटी समाजाची फक्त फसवणूक करत आहे, असा आरोप आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केला.

मनोज परब म्हणाले,  एसटी समाजाची मिशन पोलिटीकल रिर्जवेशन बॅनरखाली गेली अनेक वर्षांपासून राजकीय आरक्षणाची मागणी सुरु आहे. पण अजून या सरकारला ती पूर्ण करता आली नाही. २००३ मध्ये या समाजाला एसटीचा दर्जा मिळाला आहे. आता २० वर्षे झाली तरी याेग्य ते आरक्षण मिळत नाही. राज्यात एकूण ४० जागापैंकी किमान १० टक्के म्हणजे ४ जागा या एसटीसाठी आरक्षित असणे गरजेचे आहे. इतर राज्यामध्ये हे आरक्षण आहे. पण गाेव्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र सरकार राज्य सरकारचे ऐकून घेत नाही तरीही राज्यातील भाजपचे सरकार आपण डबल इंजिन असल्याच्या बाता मारत आहेत. असा आरोपही मनाेज परब यांनी केला.एसटी समाजावर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय होत आहे. या जमातीच्या लाेकांच्या जमिनी हडप केल्या जातात. तसेच त्यांना फक्त खोटी आश्वासने दिली जात आहेत. पण अजून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. फक्त  निवडणूका जवळ येतात त्यांना या लोकांना आरक्षणाचे आश्वासन दिली जाते पण पुन्हा त्याचा राजकारण्यांना विसर पडतो. आमच्या आरजी पक्षामध्ये अनेक एसटी समाजाचे युवक काम करत आहेत. या समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत असेचे आम्ही त्यांंच्या सोबत राहणार आहेत, असेही परब म्हणाले.

टॅग्स :goaगोवा