शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

आरजीची यावेळी विधानसभेत वेगळी चूल: आमदार वीरेश बोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2024 13:37 IST

भू संवर्धन खाजगी विधेयक आणणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आरजीची यावेळी विधानसभा अधिवेशनात संयुक्त विरोधकांसोबत नसेल, असे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. गेल्या अधिवेशनात कॉग्रेस, आप, गोवा फॉरवर्डसोबत संयुक्त विरोधकांमध्ये आरजीने सहभाग घेतला होता. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत न राहता आरजीने स्वतंत्र उमेदवार दिले व आता येत्या पावसाळी विधानसभा अधिवेशनातही ते वेगळी चूल मांडतील.

बोरकर म्हणाले की, मी यावेळी पुन्हा भू संवर्धन विधेयक आणणार आहे. गोव्यात परप्रांतियांना जमिनी विकण्यावर निर्बंध हवेच. या गोष्टीचा मी सातत्याने पाठपुरावा करीत राहीन स्थानिक गोमंतकीयांच्या हिताचे रक्षण व्हावे अशी भूमिका रिव्होल्यूशनरी गोवन्सने मांडली आहे. त्या अनुषंगाने आम्ही हे भू संवर्धन विधेयक मांडले आहे. जमिनी स्थानिकांकडेच राहाव्यात असे प्रयत्न आहेत.'

ते म्हणाले की, 'परप्रांतीय लोक लाखो रुपये खर्च करुन जमिनी विकत घेतात. त्यामुळ जमिनींचे दरही वाढलेले आहेत. पंचायती, कृषी, ग्रामीण विकास यंत्रणा आदी खात्यांबद्दलही मी विधानसभेत आवाज उठवणार आहे.

युरींचे पक्षांतरबंदीसह चार खासगी ठराव

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पक्षांतर बंदी कायदा, विधवा भेदभाव, जनमत कौल दिवस आणि अनुसूचित जातींसाठी राजकीय आरक्षणाबाबत चार खासगी ठराव सादर केले आहेत. सभापती रमेश तवडकर हे ठराव कामकाजात दाखल करून घेऊन चर्चेला आणतील, अशी अपेक्षा युरी यांनी व्यक्त केली. विधवा भेदभावाची अन्यायकारक प्रथा थांबविण्यास कायदा आणण्यासाठी सरकारने आजपर्यंत काहीही केले नाही याचे खूप वाईट वाटते, असे युरी म्हणाले.

पक्षांतर बंदी कायदा मजबूत करण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्याची गरज आहे. विधानसभेच्या सर्व सदस्यांनी दोन्ही ठरावांना पाठिंबा द्यावा आणि यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे युरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, जनमत कौल हा दिवस राज्य पातळीवर साजरा केला जात नाही. या दिवसाबाबत प्रत्येक आमदाराचे मत जाणून घेऊ.'

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण