शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Sunburn Festival 2020 : सनबर्नमागे असलेल्या राजकारण्यांचे नाव उघड करा- चर्चिल आलेमाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 17:30 IST

Sunburn Festival 2020 : सनबर्न फेस्टिवल म्हणजे केवळ अंमली पदार्थाचा बाजार असा आरोप बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी गुरुवारी केला.

मडगाव: सनबर्न फेस्टिवल म्हणजे केवळ अंमली पदार्थाचा बाजार असा आरोप बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी गुरुवारी करताना हा महोत्सव गोव्यात आयोजित करण्यात काही राजकारण्यांचाच हात आहे. मुख्यमंत्र्यांनी या राजकारण्यांची नावे जाहीर करावीत आणि अशा महोत्सवावर कायमस्वरुपी बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली.वागातोर येथे झालेल्या या महोत्सवादरम्यान तीन पर्यटकांना मृत्यू आल्याच्या पार्श्वभूमीवर असे महोत्सव बंद करा अशी मागणी वाढू लागली असून, त्यात आता आमदार चर्चिल आलेमाव यांनीही भर घातली आहे. ते म्हणाले, सनबर्न महोत्सवात एका टेबलच्या बुकिंगसाठी 12 लाख रुपये आकारले गेले होते. हा महोत्सव जर साधा संगीत रजनी असेल तर एवढे पैसे देऊन त्यात कोण येणार, असा सवाल त्यांनी केला. गोव्यातील इतर संगीत रजन्या ओसाड पडलेल्या असताना सनबर्नलाच एवढी गर्दी का असा सवाल त्यांनी केला. केवळ ड्रग्सचे सेवन करण्यासाठीच या महोत्सवात येतात याची पुरेपूर जाणीव राजकारण्यांनाही आहे. मात्र या राजकारण्यांना त्यांचा हप्ता पोहोचत असल्यामुळेच ते अशा महोत्सवांना प्रोत्साहन देतात, असा आरोप करतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या सगळ्याची चौकशी करावी अशी मागणी केली.गोव्यात सगळीकडेच अंमली पदार्थ व्यवहार फोफावला आहे काही राजकारणी व पोलीस यांची मिलिभगत या व्यावसायिकांकडे असल्यामुळेच खुलेआम हे व्यवहार चालतात. गोव्यात ािस्ती लग्नासाठीही संगीत वाजविण्याची वेळ दहा र्पयतच ठेवली जाते. मात्र किनारपट्टीवरील कित्येक हॉटेलात पहाटेपर्यंत कर्णकर्कश संगीत चालू असते. या पहाटेर्पयत चालणा-या पाटर्य़ामध्ये अंमलीपदार्थ खुलेआम विकले जातात. मात्र पोलीस व राजकारण्यांचा या व्यावसायिकांना वरदहस्त असल्यामुळेच त्याच्या वाटेला कुणी जात नाहीत असा आरोप त्यांनी केला. गोव्याकडे चांगल्या पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. याचे कारणही हा ड्रग व्यवसायच आहे. आपली मुले या अमली पदार्थाच्या विळख्यात सापडू नयेत किंवा त्यांना विनाकारण या सापळ्यात अडकवले जाऊ नये यासाठीच विदेशी पर्यटक आपल्या मुलांना गोव्यात पाठवत नाहीत असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हल