शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या अपात्रता याचिकेवर तीन महिन्यांत निकाल द्या, सभापतींना काँग्रेसची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 17:41 IST

काँग्रेसचे जे दहा आमदार गेल्यावर्षी भाजपमध्ये गेले, त्यांच्याविरुद्ध सादर झालेल्या अपात्रता याचिकेवर तीन महिन्यांत निवाडा दिला जावा, अशी विनंती काँग्रेस पक्षाने आपल्या वकिलाद्वारे गुरुवारी सभापतींना केली आहे.

पणजी - काँग्रेसचे जे दहा आमदार गेल्यावर्षी भाजपमध्ये गेले, त्यांच्याविरुद्ध सादर झालेल्या अपात्रता याचिकेवर तीन महिन्यांत निवाडा दिला जावा, अशी विनंती काँग्रेस पक्षाने आपल्या वकिलाद्वारे गुरुवारी सभापतींना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निवाडय़ाद्वारे सभापतींना तीन महिन्यांत निवाडा देणे बंधनकारक झाले आहे, असा मुद्दा वकिलानी सभापतींसमोर मांडला आहे.बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे दहा आमदार गेल्यावर्षी काँग्रेसमधून बाहेर पडले व त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दहाजणांनी आमदारकीचे राजीनामे दिले नाहीत. आता दहापैकी काहीजण विद्यमान सरकारमध्ये मंत्री आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका सादर केलेली आहे. या याचिकेवर अजून सुनावणी सुरू आहे.गुरुवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी दहा आमदारांच्या वकिलाने आपले उत्तर सादर करण्यासाठी वेळ दिला जावा अशी विनंती सभापतींना केली. काँग्रेसतर्फे वकील अभिजित गोसावी यांनी बाजू मांडली. केशाम मेघचंद्र सिंग विरुद्ध मणिपूर विधानसभेचे सभापती यांच्याविषयीच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 21 जानेवारी रोजी निवाडा दिला आहे. शक्य तो तीन महिन्यांत सभापतींनी अपात्रता याचिका निकालात काढायला हवी अशा प्रकारचा तो निवाडा आहे. त्याचा संदर्भ अॅड. गोसावी यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर ठेवला व काँग्रेसची याचिका सादर झाल्यानंतर आतार्पयत तीन महिने होऊन गेले तरी, न्यायालयीन निवाड्यानंतरचे तीन महिने आता विचारात घेऊन निवाडा दिला जावा अशी विनंती केली. दहा आमदारांना त्यांचे म्हणणो सादर करण्यासाठी वेळ देतानाच एकूण तीन महिन्यांची मुदत टळून जाणार नाही याची काळजी घेऊन त्यानुसार सुनावणीचे व्यवस्थापन केले जावे, अशी विनंती त्यांनी केली. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ाची नोंद घेईन, असे सभापतींनी काँग्रेसच्या वकिलास सांगितले. त्यांनी प्रतिवादींना म्हणणे सादर करण्यास चार आठवडय़ांची मुदत दिली आहे. पण पुढील सुनावणी कोणत्या दिवशी घ्यावी ते अजून निश्चित झालेले नाही.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा