शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रदर्शनाला जगभरातील चाहत्यांचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 11:58 IST

पणजी : गोव्यात सुरू असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारत सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामार्फत भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनीचे महोत्सवात दाखल झालेल्या जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले.

संदीप आडनाईकपणजी : गोव्यात सुरू असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारत सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामार्फत भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनीचे महोत्सवात दाखल झालेल्या जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले. भारतीय चित्रपटसृष्टीला योगदान देणा-या महिला कलाकारांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामार्फत हे पोस्टर प्रदर्शन येथील कला अकादमी परिसरात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आले होते.स्त्री : अ ट्रिब्यूट टू वूमनहूड इन इंडियन सिनेमा, असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय महिला कलावंतांचे जीवन आणि त्यांच्याशी संबंधित संघर्षाचा प्रवास मांडण्यात आला आहे. या प्रदर्शनात भारतीय महिला चित्रपट कलावंत आणि निर्मात्यांच्या योगदानाचा आलेख मांडण्यात आला आहे. प्रदर्शनात हिंदी चित्रपटांच्या सुरुवातीच्या कालखंडातील मीराबाई या चित्रपटाच्या पोस्टरपासून आताच्या चक दे इंडियाचे पोस्टरचा समावेश आहे.माजिद माजीदी प्रभावितचिल्ड्रन्स आॅफ हेवन्स या गाजलेल्या चित्रपटाचे इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी या संग्रहालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत आॅस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमानही होते. माजिद माजिदी यांनी या प्रदर्शनीचे कौतुक करत भारतीय चित्रपटांचा इतिहास आणि वारसा जतन करण्याचे काम संग्रहालय करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. माजिदी यांनी साहब, बीवी और गुलाम, सुजाता, मदर इंडिया, प्यासा यासारखे महिलाकेंद्रीत चित्रपट पाहिल्याची आठवण सांगितली.रेहमान झाले सद्गदितप्रदर्शनात १९५३ चा अवैय्यार या तमीळ चित्रपटाचे पोस्टर पाहून या चित्रपटाला संगीत देणाºया ए. आर. रेहमान यांना आपल्या आठवणींना आवर घालता आला नाही. हे पोस्टर पाहून ते सद्गदित झाले. आयोजकांकडे त्यांनी या पोस्टरची प्रत आवर्जुन मागवून घेतली. या चित्रपटातील गाण्यांनी इतिहास रचला होता, असे रेहमान यांनी सांगितले.राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय भारतीय चित्रपटांचा इतिहास आणि वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक जुन्या भारतीय क्लासिक चित्रपटांचा संग्रह संस्थेकडे आहे आणि तो जपण्यात येत आहे.प्रकाश मगदूम.

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017