शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रदर्शनाला जगभरातील चाहत्यांचा प्रतिसाद; माजीद माजिदी, ए. आर. रेहमान यांच्याकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 00:57 IST

गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारत सरकारच्या राष्टीय चित्रपट संग्रहालयामार्फत भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनीचे महोत्सवात दाखल झालेल्या जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले.

- संदीप आडनाईकपणजी : गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारत सरकारच्या राष्टीय चित्रपट संग्रहालयामार्फत भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनीचे महोत्सवात दाखल झालेल्या जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले.भारतीय चित्रपटसृष्टीला योगदान देणाºया महिला कलाकारांचा सन्मान करण्यासघटी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामार्फत हे पोस्टर प्रदर्शन येथील कला अकादमी परिसरात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आले होते.स्त्री : अ ट्रिब्यूट टू वूमनहूड इन इंडियन सिनेमा, असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय महिला कलावंतांचे जीवन आणि त्यांच्याशी संबंधित संघर्षाचा प्रवास मांडण्यात आला आहे. या प्रदर्शनात भारतीय महिला चित्रपट कलावंत आणि निर्मात्यांच्या योगदानाचा आलेख मांडण्यात आला आहे. प्रदर्शनात हिंदी चित्रपटांच्या सुरुवातीच्या कालखंडातील मीराबाई या चित्रपटाच्या पोस्टरपासून आताच्या चक दे इंडियाचे पोस्टरचा समावेश आहे.माजिद माजीदी प्रभावितचिल्ड्रन्स आॅफ हेवन्स या गाजलेल्या चित्रपटाचे इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी या संग्रहालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत आॅस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमानही होते. माजिद माजिदी यांनी या प्रदर्शनीचे कौतुक करत भारतीय चित्रपटांचा इतिहास आणि वारसा जतन करण्याचे काम संग्रहालय करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. माजिदी यांनी साहब, बीवी और गुलाम, सुजाता, मदर इंडिया, प्यासा यासारखे महिलाकेंद्रीत चित्रपट पाहिल्याची आठवण सांगितली.रेहमान झाले सद्गदितप्रदर्शनात १९५३ चा अवैय्यार या तमिळ चित्रपटाचे पोस्टर पाहून या चित्रपटाला संगीत देणाºया ए. आर. रेहमान यांना आपल्या आठवणींना आवर घालता आला नाही. हे पोस्टर पाहून ते सद्गदित झाले. आयोजकांकडे त्यांनी या पोस्टरची प्रत आवर्जुन मागवून घेतली. या चित्रपटातील गाण्यांनी इतिहास रचला होता, असे रेहमान यांनी सांगितले.राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय भारतीय चित्रपटांचा इतिहास आणि वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक जुन्या भारतीय क्लासिक चित्रपटांचा संग्रह संस्थेकडे आहे आणि तो जपण्यात येत आहे.- प्रकाश मगदूम.संचालक,  चित्रपट संग्रहालय

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017