शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृत भाषा घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प; अडीच हजार विद्यार्थ्यांनी एकत्र सादर केले गीतेतील अध्याय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 11:10 IST

संस्कृत भारती गोवातर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: देववाणी व सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेला घरोघरी पोहोचविण्यासाठी शाळांमध्ये प्राथमिक स्तरापासून मुलांना रुची निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेत एक संस्कृत शिक्षक नियुक्त केला जात आहे. भाषा संचालनालय सर्व भाषांप्रमाणे संस्कृतला प्रोत्साहन देताना शैक्षणिक तसेच इतर उपक्रमांसाठीही भरीव सहकार्य करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

संस्कृत भारती, गोवातर्फे 'गीतामृतम्' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डिचोली तालुक्यातील विविध हायस्कूलमधील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांकडून भगवद्‌गीतेतील बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे पठण करण्यात आले. हा ऐतिहासिक सोहळा साखळीतील नगरपालिका मैदानावर संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, रिवण येथील श्री विद्यापाठशालाच्या आचार्य अपर्णा देवदत्त पाटील, साखळीतील कार्यकर्ते, संस्कृत भारतीचे अध्यक्ष आनंद देसाई, राजभाषा संचालनालयाचे उपसंचालक अनिल सावंत, स्वागताध्यक्ष शिवानंद खेडेकर, प्रसाद उमर्ये, नगराध्यक्षा रश्मी देसाई, गोपाळ सूर्लकर उपस्थित होते.

यावेळी अनिल सावंत यांनी मार्गदर्शन केले, प्रमुख वक्त्या अपर्णा देवदत्त पाटील यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. चार दशके संस्कृत भारतीचे कार्य गोव्यात चालू आहे. गीता हा ज्ञानाचा ग्रंथ सर्व शाळांपर्यंत पोहोचवावा. हे कार्य सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून पुढील जीवनात त्यांना उपयोगी पडणार आहे. यासाठी त्यांना शिकविण्यात आले. प्रत्येक शाळेतील पाच मुलांनी प्रातिनिधीक स्वरूपात मंचावर येऊन पठण केले व इतर मुलांनी समोर बसून पठण केले. 

प्रसाद उमर्ये यांनी गीतेच्या माध्यमातून संस्कृतीची गोडी लागावी व जीवनाचा मंत्र मिळावा, या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. संस्कृत गोवाभर पसरावे व पुढील कार्यकाळांमध्ये सर्व शाळांमध्ये संस्कृत शिकवावे, असे यावेळी प्रसाद उमर्ये यांनी सांगितले.

प्राथमिक स्तरापासून मान्यता दिली

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी देवांची, वेदांची भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत भाषेला पुढे नेण्यासाठी मोदी सरकारने अनेक उपक्रम सुरू करून प्राथमिक स्तरापासून तिला मान्यता दिली. त्यामुळे आज देशभरातील लाखो शाळांतील विद्यार्थी ती शिकत असून, त्यातून मानवी जीवन समृद्ध करण्याची शक्ती निर्माण होणार आहे. गोव्यात या भाषेचे चांगले कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत