शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'दोन वर्षात डांबरीकरण खराब झाल्यास कंत्राटदाराच्या पैशातून दुरुस्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 17:29 IST

रस्त्यांसाठी थेट इराण, इराकहून डांबर मागवणार

मडगाव: गोव्यात सगळीकडेच रस्त्यांची दुर्दशा झाली असून खड्डे पडलेले रस्ते ही लोकांसाठी डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यावर टीकेची झोड उठत आहे. या पार्श्वभूमीवर दोन वर्षामध्ये रस्त्यावरील डांबरीकरण खराब झाल्यास त्या रस्त्यांची दुरुस्ती कंत्राटदाराच्या पैशातून करुन घेण्यात येईल आणि दुरुस्ती न करणाऱ्या कंत्राटदारांना थेट काळ्या यादीत टाकले जाईल असे या खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी स्पष्ट केले आहे. गोव्याच्या बहुतांश भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे गोव्यातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी चांगल्या प्रतीचे डांबर मिळावे यासाठी इराण किंवा इराकमधून त्याची थेट आयात करण्याचेही सरकारने ठरवले आहे असे त्यांनी सांगितले. पाऊसकर म्हणाले, कुठल्याही रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर तीन वर्षे त्याची देखभाल करणो हे रस्ते बांधलेल्या कंत्राटदाराचे काम असते. त्यानुसार 2018 व 2019 मध्ये डांबरीकरण केलेले रस्ते जर खराब झाले तर पावसानंतर कंत्राटदारांच्या पैशातून त्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार. ते करण्यापासून त्यांनी नकार दिल्यास त्यांना थेट काळ्या यादीत टाकले जाणार आहे.पावसात रस्ते वाहून जाऊ नयेत यासाठी चांगल्या प्रतीच्या डांबराचा वापर करणे आवश्यक आहे. सध्या गोवा मुंबई किंवा मंगळुरुहून डांबरीकरणासाठी डांबर आणला जातो. मात्र यापुढे हे डांबर थेट गोव्यातच उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. गोव्याला दरवर्षी 50 हजार मेट्रिक टन डांबराची गरज भासते. मात्र हे प्रमाण कमी असल्याने कंपन्या थेट निर्यात करण्यास तयार नसतात. तरीही काही कंपन्यांनी ही तयारी दाखवली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या मध्यस्थीतून हे डांबर थेट गोव्यात आणण्यासाठी आमचे प्रयत्न असतील असे ते म्हणाले. जर हे शक्य झाले नाही तर गोव्याला जवळ असलेल्या कारवार बंदरावर डांबर मागवून ते गोव्यात आणले जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र यासाठी काही काळ जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, गोव्यातील बाराही तालुक्यातील रस्त्यांना जे खड्डे पडले आहेत ते बुजविण्याची तयारी खात्याने केली आहे. यासाठी रेडीमिक्स काँक्रिटचा वापर केला जाणार आहे. मात्र त्यासाठी सलग दोन दिवस पावसाने विश्रंती घेण्याची गरज आहे. सध्या सतत पाऊस पडत असल्यामुळे या कामात अडथळा येत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Potholeखड्डेgoaगोवा