शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नातू आणि सून काढतेय मनोहर पर्रीकरांची आठवण; उत्पल पर्रीकर यांनी दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 02:43 IST

माझा मुलगा ध्रुव याला माझे वडील तथा ध्रुवचे आजोबा स्व. मनोहर पर्रीकर यांनी खूप लळा लावला होता.

- सदगुरू पाटील पणजी : माझा मुलगा ध्रुव याला माझे वडील तथा ध्रुवचे आजोबा स्व. मनोहर पर्रीकर यांनी खूप लळा लावला होता. त्यांनी व्यस्त जीवनातूनही वेळ काढून नातवाला प्रेम दिले होते. आता भाई जाऊन साडेआठ महिने झाले; पण रोज मुलगा आठवण काढतोय. शाळेत जाताना व शाळेतून घरी आल्यानंतर ध्रुव रोज घरातील भाईंच्या फोटोला नमस्कार करतोय, अशा शब्दांत उत्पल पर्रीकर यांनी खास ‘लोकमत’कडे आपल्या आठवणी गुरुवारी जागविल्या.

माझी पत्नी रोज सकाळी पाच किंवा साडेपाचला उठते. पूर्वीही जेव्हा ती उठायची तेव्हा भाई जागे आहेत व सरकारी फाइल्स तपासत बसले आहेत असे चित्र तिला साडेपाचच्या सुमारास दिसायचे. मग ती त्यांना चहा द्यायची. त्यामुळे तिला रोज सकाळी उठली की, प्रथम भार्इंना चहा देण्याची सवय झाली होती. आता पहाटे उठल्यानंतर भाई घरात नाहीत हे तिला अनुभवास येते.

माझा मुलगा ध्रुव यास भार्इंनी खेळणी आणली होती. ती खेळणी घेऊन तो खेळतो. कधी घरातील गप्पागोष्टींवेळी तर कधी घराबाहेरील चर्चेमुळे किंवा एखाद्या घटनेमुळे ही आठवण जागी होते. गेल्या दि. १८ नोव्हेंबरला माझा वाढदिवस होता. यावर्षी वाढदिवस साजरा करायचा नाही, फक्त कुटुंबासोबत सायंकाळ घालवायची एवढेच मी ठरविले होते. त्यामुळे वाढदिवशी मी सकाळी नेहमीप्रमाणे माझ्या फॅक्टरीमध्ये गेलो.

मात्र, भाजपच्या पणजीतील कार्यकर्त्यांनी मला फोन केला. तुम्ही सायंकाळी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात यायलाच हवे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. शेवटी मी तिथे गेलो व सायंकाळी भार्इंच्या मोठ्या कुटुंबासोबत माझा वाढदिवस साजरा झाला. भाजप कार्यकर्ते म्हणजे भार्इंचे मोठे कुटुंबच आहे, असे उत्पल म्हणाले. भाई नसले तरी, गोवाभरातील भाजप कार्यकर्त्यांशी माझे भावनिक नाते आहे व ते नाते गेल्या साडेआठ महिन्यांतही वाढत गेले, असे उत्पल म्हणाले.

भाई जर आज असते तर केंद्राचे नागरिकत्व विधेयक, काश्मीरप्रश्नी मोदी सरकारने घेतलेला निर्णय व अयोध्याप्रश्नी झालेला न्यायालयीन निवाडा हे पाहून त्यांचे मन समाधानाने भरून आले असते, असे उत्पल यांनी नमूद केले.--------

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा