शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

विदेशी पर्यटकांना व्हिसा शुल्काची काही रक्कम परत करण्याचा प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:30 IST

विदेशी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी नवा प्रस्ताव विचाराधीन असून त्यानुसार व्हिसा शुल्काची काही रक्कम परत केली जाणार आहे. विदेशी पाहुण्यांनी गोव्याकडे पाठ फिरवल्याने सरकारने ही शक्कल लढविली आहे. 

ठळक मुद्देविदेशी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी नवा प्रस्ताव विचाराधीन असून त्यानुसार व्हिसा शुल्काची काही रक्कम परत केली जाणार आहे. विदेशी पाहुण्यांनी गोव्याकडे पाठ फिरवल्याने सरकारने ही शक्कल लढविली आहे. बुधवारी झालेल्या पर्यटन विषयक उच्चस्तरीय बैठकीतही याबाबत गांभीर्याने चर्चा झाली.

पणजी - विदेशी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी नवा प्रस्ताव विचाराधीन असून त्यानुसार व्हिसा शुल्काची काही रक्कम परत केली जाणार आहे. विदेशी पाहुण्यांनी गोव्याकडे पाठ फिरवल्याने सरकारने ही शक्कल लढविली आहे. 

पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी यास दुजोरा दिला. बुधवारी झालेल्या पर्यटन विषयक उच्चस्तरीय बैठकीतही याबाबत गांभीर्याने चर्चा झाली. विदेशी पर्यटकांची संख्या प्रचंड घटल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.  पर्यटन क्षेत्राला यंदा लागलेले ग्रहण म्हणजे चार्टर विमानांची कमी झालेली संख्या होय. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात पर्यटक र्चाटर विमानांच्या संख्येत ५५ टक्क्यांनी घट झाली. रशियन पर्यटकांची संख्याही कमी झाली. विदेशींची पर्यटन बाजारपेठ मिळविण्यासाठी खात्याचे मंत्री, अधिकारी यांनी केलेल्या विदेश दौऱ्याचे हेच काय फलित असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. गेली आठ वर्षे रशियन पर्यटकांची संख्या चढत्या आलेखाने वाढत गेली. परंतु यंदा मात्र चित्र वेगळेच आहे. 

दाबोळी विमानतळावर इ व्हिसाची उपलब्ध केलेली सोय ही खरे तर पर्यटन उद्योगाच्यादृष्टीने जमेची बाजू होय. असंख्य विदेशी पाहुण्यांनी इ व्हिसाचा लाभ घेतलेला आहे. ज्या विदेशी नागरिकांनी इ टुरिस्ट व्हिसाचा लाभ घेतला त्यात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया, जॉर्डन, स्वीडन, न्युझिलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, चीन, जपान, फिलिपिन्स, सिंगापूर, स्पेन व अन्य देशांच्या नागरिकांचा समावेश होता. 

‘२0१५-१६ साली केवळ ७९८ चार्टर विमाने आली. तशीच स्थिती यंदाच्या पर्यटक हंगामातही उद्भवली आहे. ऑक्टोबरमध्ये ५३ चार्टर विमाने आली तर नोव्हेंबरमध्ये २३0 चार्टर विमाने दाबोळीवर उतरली. गेल्या वर्षी (२0१७) आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे ही संख्या १0५ व ३१८ होती. पहिल्या दोन महिन्यात ५२,७६८ विदेशी पर्यटक आले. गेल्या वर्षी वरील दोन महिन्यात ही संख्या ८२,0५७ एवढी होती. गेल्या वर्षी पहिल्या दोन महिन्यांच्या तुलनेत चार्टर विमानांची संख्या ४0 नी घटली आहे. दरवर्षी गोव्याचे पर्यटनमंत्री, अधिकारी विदेशात पर्यटन मेळ्यांमध्ये सहभागी होत असतात. ज्या देशात जातील तेथे ‘रोड शो’ करतात. परंतु त्याचे फलित मात्र दिसत नाही, अशी तक्रार आहे. 

पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष सावियो मेशियस यांनी या प्रकाराला सरकारचे चुकीचे मार्केटिंग धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन