शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

गोव्यातील भाजपचे वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:12 IST

गोव्यातील राजकारणाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये विश्वासाची भावना निर्माण केली आहे की नाही, याचा विचार पक्षाने आत्मपरीक्षण करून करायला हवा.

दिनेश जल्मी, अभ्यासक

दत्ता खोलकर यांचा अध्यक्षांचा अवमान करणारे पक्ष कार्यकर्ते कसे? हा 'संकल्प से सिद्धी तक' या मोहिमेवरील लेख वाचल्यानंतर काही प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. त्यांनी भाजपच्या निःस्वार्थ कार्यकर्त्यांचे आणि पक्षाच्या तत्त्वांचे कौतुक केले आहे, पण आजच्या घडीला भाजप खरोखरच या तत्त्वांचे पालन करत आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यांची भाषा काहीशी कडवी आणि लोकशाहीच्या मर्यादेबाहेरची वाटते, विशेषतः जेव्हा ते 'दामू नाईक कोण?' असा प्रश्न विचारणाऱ्यांबद्दल बोलतात. त्यांची पक्षातील शिस्त आणि राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याची भाषा ऐकून, त्यांनी स्वतःच्याच पक्षातील सध्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष केले आहे का, असा विचार मनात येतो.

शिस्त आणि निष्ठाः फक्त बोलण्यापुरती ?

खोलकर म्हणतात की भाजपचे कार्यकर्ते सेवा, शिस्त आणि पक्षाने दिलेल्या जबाबदारीच्या भावनेने प्रेरित होऊन काम करतात. ते असेही म्हणतात की पक्षाच्या तत्त्वांवर विश्वास ठेवणारेच मनापासून काम करू शकतात आणि भाजप 'प्रथम राष्ट्र, नंतर संघटना आणि शेवटी व्यक्ती' या तत्त्वाचे पालन करतात. हे ऐकायला खूप चांगले वाटते, पण गेल्या काही वर्षात गोव्याच्या राजकारणात भाजपचे वर्तन पाहिले तर हे विधान किती खरे आहे, यावर शंका येते.

गोव्यामध्ये भाजपने इतर पक्षांमधून मोठ्या संख्येने आमदार आपल्या पक्षात घेतले आहेत. काँग्रेस, मगोप आणि इतर पक्षांमधून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे दिली गेली आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केले, निष्ठेने संघर्ष केला, त्यांची उपेक्षा करून पक्षांतर केलेल्यांना महत्त्व देणे कितपत योग्य आहे? यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना कोणती प्रेरणा मिळते? ज्यांनी कधीकाळी भाजपच्या विरोधात रान उठवले, तेच आज भाजपच्या व्यासपीठावर दिसत आहेत. मग 'सेवा, शिस्त आणि पक्षाला समर्पण' या गोष्टी केवळ बोलण्यापुरत्याच राहिल्या आहेत का? 

वडाच्या झाडाची सावली की स्वार्थाची लागण?

खोलकर यांनी भाजपची तुलना वडाच्या झाडाशी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की वडाच्या झाडाची फांदी तुटली किंवा पाने पडली तरी काही फरक पडत नाही, कारण हे झाड सर्वांना आश्रय देते. भाजपही १४ कोटी सदस्यांसह एक विशाल पक्ष बनला आहे, असे ते अभिमानाने सांगतात. पण याच वडाच्या झाडाला आता स्वार्थाची लागण झाली आहे का? गोव्यात आपण पाहिले आहे की, केवळ सत्तेसाठी अनेक आमदारांनी पक्ष बदलले. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी आणि मंत्रिपदाच्या लालसेपोटी पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवली. ज्यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते कधीकाळी टीका करत होते, तेच आज भाजपचे शिलेदार बनले आहेत.

खोलकर यांनी केशुभाई पटेल, येडियुरप्पा, कल्याण सिंह, मदनलाल खुराणा यांसारख्या नेत्यांची उदाहरणे दिली, ज्यांनी पक्ष सोडला आणि त्यांची विश्वासार्हता गमावली. गोव्यातही असे घडले असे ते म्हणतात. पण त्यांनी हे का सांगितले नाही की ज्यांना कधीतरी भाजप विरोधक मानले जायचे त्या अनेक नेत्यांना भाजपने स्वतःहून आपल्या पक्षात घेतले? यातून पक्षाची तत्त्वे, शिस्त आणि निष्ठेचे काय झाले? "भाजप कार्यकर्त्यांना वैयक्तिक हित आणि राष्ट्रीय हित यांच्यातील धोरण स्वीकारावे लागेल' असे ते म्हणतात, पण जे नेते सत्तेसाठी आणि मंत्रिपदासाठी पक्ष बदलतात, त्यांना भाजपने स्वीकारून कोणती नीतिमत्ता जपली आहे?

प्रदेशाध्यक्षांचा आदर आणि लोकशाहीची कुचंबणा

दामू नाईक यांच्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांवर खोलकर यांनी जोरदार टीका केली आहे. 'हा दामू नाईक कोण आहे?' 'त्याला कारवाईच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार आहे का?' असे प्रश्न विचारणे हास्यास्पद असल्याचे ते म्हणतात. नाईक हे चार लाख चोवीस हजार पक्ष सदस्यांनी निवडलेले पदसिद्ध प्रदेशाध्यक्ष आहेत, असे ते स्पष्ट करतात. यात शंका घेण्याचे कारण नाही, पण लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पक्षीय शिस्त आणि आदर महत्त्वाचा असला तरी, कोणालाही प्रश्न विचारण्यापासून रोखणे किंवा त्यांना 'हास्यास्पद' ठरवणे हे लोकशाही मुल्यांना धरून नाही.

जर प्रदेशाध्यक्षांबद्दल प्रश्न विचारणे हास्यास्पद असेल, तर इतर पक्षांमधून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे देऊन वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करणे हे किती गंभीर आहे? ज्यांनी कधीकाळी भाजपच्या विरोधात आवाज उठवला, ते आज पक्षाचे प्रमुख चेहरा बनले आहेत. यामुळे पक्षाच्या संघटनात्मक संस्कृती आणि शिष्टाचाराचे काय होते, असा प्रश्न निर्माण होतो.

प्रियोळ मतदारसंघाचे राजकारण आणि कार्यकर्त्यांचा बळी

खोलकर यांनी प्रियोळ मतदारसंघाचा इतिहास देऊन तेथे भाजप आणि मगोपचे वर्चस्व कसे राहिले आहे, हे दाखवून दिले आहे. २००९ पासून श्रीपाद नाईक यांना प्रियोळच्या मतदारांनी नेहमीच मोठी आघाडी दिली आहे, असे ते म्हणतात. हे खरे असेलही, पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्याचे काय? प्रियोळमध्ये भाजपने २०१७ मध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यानंतर २०२२ मध्ये विद्यमान आमदाराने पुन्हा मोठा विजय मिळवला. ज्यांनी भाजपचा पाठिंबा मागितला आणि नंतर भाजपमध्ये सामील झाले, ते पक्षाच्या 'निःस्वार्थ सेवा' या तत्त्वाचे पालन करत होते की वैयक्तिक हितासाठी पक्ष बदलले? आज गोव्यातील भाजपचे राजकारण पाहता, पक्ष कार्यकर्त्यांचा नव्हे, तर 'आयारामांचा' पक्ष बनत चालला आहे, अशी भावना सामान्य लोकांमध्ये आहे. कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे रक्त आटवून पक्ष वाढवला, पण जेव्हा सत्तेची वेळ आली, तेव्हा बाहेरून आलेल्यांना संधी दिली गेली. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचते आणि त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

भविष्यातील दिशाः तत्त्वे की केवळ सत्ता?

खोलकर आपल्या लेखाच्या शेवटी म्हणतात की 'राष्ट्रीय हित आणि पक्षनिष्ठा ही सर्वोत्तम मानली जाते, वैयक्तिक हित नाही. हे निश्चितच आदर्श वाक्य आहे. पण आजच्या गोव्यातील भाजपच्या राजकारणात हे तत्त्व किती पाळले जाते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, सदानंद शेट तानावडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळाले आहे असे ते म्हणतात. पण हे यश केवळ पक्षनिष्ठा आणि राष्ट्रीय हितावर आधारित आहे की सत्तेच्या जोरावर इतर पक्षांमधील आमदारांना सामावून घेतल्यामुळे ?

भाजपचे कार्यकर्ते निःस्वार्थपणे काम करतात, हे सत्य असू शकते. पण पक्षाच्या शीर्षस्थानी बसलेले नेते जेव्हा सत्तेसाठी तत्त्वे बाजूला ठेवतात, तेव्हा या निःस्वार्थ कार्यकर्त्यांचे भविष्य काय? 'संकल्प से सिद्धी तक' हे केवळ घोषवाक्यच राहू नये, तर ते खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात यावे अशी अपेक्षा आहे. गोव्यातील राजकारणाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये विश्वासाची भावना निर्माण केली आहे की नाही, याचा विचार पक्षाने आत्मपरीक्षण करून करायला हवा.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण