शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोव्यात पोलिसांना लाच देऊन रेव्ह पार्ट्या, आमदार विनोद पालयेंकर यांचा रोखठोक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 21:25 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे गृह खाते असले तरी केवळ खनिज वाहतुकीतच त्यांना रस आहे. कायदा सुव्यवस्थेचे त्यांना सोयरसूतक नाही. मुख्यमंत्री गुन्हेगारी हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.

 पणजी  - रेव्ह पार्टी झालेले वागातोर ज्या मतदारसंघात येते त्या शिवोलीचे गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेंकर यांनी तीव्र संताप व्यक्त करताना असे म्हटले आहे की, किनारपट्टी भागात राजरोसपणे रेव्ह पार्ट्या होत असल्याचे मी वेळोवेळी सरकारच्या निदर्शनास आणले, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आली. स्थानिक पोलिसांना लांच देऊन बिनदिक्कत रेव्ह पार्ट्यांची आयोजन केले जात आहे. हणजुण पोलिस निरीक्षकासह इतरांना या स्थानकावरुन हटवून पूर्णपणे फेररचना करायला हवी. तसेच राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री आवश्यक आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे गृह खाते असले तरी केवळ खनिज वाहतुकीतच त्यांना रस आहे. कायदा सुव्यवस्थेचे त्यांना सोयरसूतक नाही. मुख्यमंत्री गुन्हेगारी हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.लोबोच गृहमंत्री योग्य दरम्यान, पालयेंकर यांनी उपरोधिकपणे असेही म्हटले आहे की, ह्यमंत्री मायकल लोबो हे गृहमंत्री म्हणून चांगली कामगिरी बजावू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लोबो यांना गृह खाते द्यावे. कळंगुटमध्ये राजकारणी-ड्रग माफिया हितसंबंध - अपक्ष आमदार रोहन खंवटेंचा आरोपदरम्यान, कळंगुटमध्ये राजकारणी-ड्रग माफिया हितसंबंध असल्याचा आरोप अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केला असून पोलिस महासंचालक मुकेशकुमार मीना यांनी वागातोर येथे रेव्ह पार्टीवर धडक कारवाई केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. राजकारणी-ड्रग माफिया हितसंबंधांची माहिती डीजीपींनाही आहे, असे खंवटे म्हणतात. गोवेकरांना ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नवे डीजीपी चांगली कामगिरी बजावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. कळंगुट किनारपट्टी भागात क्वारंटाइन पर्यटनाला प्रोत्साहन देण्यामागे ड्रग्स हेही एक कारण आहे. पर्यटक बंद झाल्यास ड्रग्स बंद होतील, ही भीती या माफियांना आहे, असे खंवटे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा