शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन विकास महामंडळावर पाटणेकर तर एनआरआय आयुक्तपदी गांवकरांची वर्णी लागण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 13:08 IST

नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास महामंडळ डिचोलीचे  भाजपा आमदार राजेश पाटणेकर यांच्याकडे तर एनआरआय आयुक्तपद सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. 

पणजी - नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास महामंडळ डिचोलीचे  भाजपा आमदार राजेश पाटणेकर यांच्याकडे तर एनआरआय आयुक्तपद सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. 

निलेश काब्राल हे मंत्री झाल्याने आता त्यांच्याकडील पर्यटन महामंडळ अन्य एखाद्या आमदाराकडे द्यावे लागणार आहे. राजेश पाटणेकर हे या महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी फ्रंट रनर असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पाटणेकर यांच्याकडे सध्या हस्तकला महामंडळ आहे. परंतु या महामंडळाच्या अध्यक्षपदावर पाटणेकर समाधानी नाहीत. 

प्रसाद गांवकर हे अपक्ष आमदार असून भाजपा आघाडी सरकारसोबत ते पहिल्या दिवसापासून राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना काही ना काही बक्षिसी सरकारला द्यावीच लागणार आहे. गांवकर हे सरकारबरोबर असले तरी काहिसे नाराज आहेत. काल नवे मंत्री मिलिंद नाईक आणि निलेश काब्राल यांच्या राजभवनवरील शपथविधी सोहळ्यास पणजीत असूनही ते गैरहजर राहिले. आपल्याला एखादे वजनदार महामंडळ मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. परंतु तूर्त त्यांचे नाव अनिवासी भारतीय आयुक्त (एनआरआय) पदासाठी आघाडीवर आहे. 

पाटणेकर यांना पर्यटन महामंडळ दिल्यास हस्तकला महामंडळावर नवा अध्यक्ष नेमावा लागणार आहे. तेथे एखाद्या अन्य आमदाराची वर्णी लागू शकते. आमदार पाटणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर मौन पाळणे पसंत केले. ते म्हणाले की, ‘ आपल्याला या विषयावर काहीही भाष्य करायचे नाही’. आमदार प्रसाद गांवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते सरकारवर नाराज असल्याचे संकेत मिळाले. एनआरआय आयुक्तपदाचा प्रस्ताव आहे का, असे विचारले असता अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. आल्यानंतर विचार करु, असे उत्तर त्यांनी  दिले. यावर अधिक काही बोलण्याचे त्यांनी टाळले.  

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा