सद्गुरू पाटील ल्ल पणजी काबो-दोनापावल येथील राजभवन हे कधीच थेट स्वच्छता मोहिमेत उतरले नव्हते. मात्र, आता राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्यामुळे स्थिती बदलली आहे. राजभवनमधील अधिकाऱ्यांसह सगळ्यांनीच स्वच्छतेचा विषय खूप गंभीरपणे घेतला आहे. परिणामी प्रथमच राजभवनमधील स्टोअर रुम, वाचनालय यासह साराच परिसर व राजभवनचा आतील भाग स्वच्छ झाला आहे. राजभवनमधील स्टोअर रुम कधीच स्वच्छ केली गेली नव्हती. मात्र, राज्यपाल सिन्हा यांनी ती स्टोअर रुमही स्वच्छ करा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली व त्यांनी कामगारांकडून ती रुम स्वच्छ करून घेतली. राजभवनमध्ये एक वाचनालय हवे आहे, असे स्वत: लेखिका व कवयित्री असलेल्या सिन्हा यांनी सांगितले. प्रत्यक्षात राजभवनमध्ये वाचनालय होते; पण ते कधी (पान २ वर)
‘राजभवन’ने घेतली हाती झाडू
By admin | Updated: September 8, 2015 02:00 IST