लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नैर्ऋत्य मान्सून पावसाने काल, सोमवारी यंदाही सरासरीचा टप्पा गाठत लक्ष्यपूर्ती केली. काल, दिवसभर पावसाची रिमझिम चालू राहिली. सायंकाळनंतर हंगामी सरासरी पाऊस ११८ इंच झाला.
भारतीय हवामान खात्याने काल, यलो अलर्ट जारी केला होता. पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळतील अशी शक्यता वर्तविली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत राहिल्या. राज्यभर दिवसभर हलका पाऊस पडला. दरवर्षी राज्यात पडतो. काल ११७ इंच असलेला एकूण हंगामी पाऊस रात्री वार्षिक सरासरीपर्यंत पोहोचला. आणि त्याची लक्ष्यपूर्ती झाली.
यंदा जून महिन्यात भरपूर पाऊस पडला. या एकाच महिन्यात ३० इंचाहून अधिक पाऊस कोसळला होता. जुलै आणि ऑगस्टमध्येही पाऊस चांगलाच बरसला. सप्टेंबर हा पावसाळ्यातील अखेरचा महिना. ३० तारखेपर्यंत पडलेला पाऊस हा हंगामी मान्सून म्हणून नोंद होतो. त्यानंतर पडलेला पाऊस हा मान्सूनोत्तर असा नोंदवला जातो. अजून १५ दिवस बाकी राहिले असताना यंदा विक्रमी पावसाची शक्यता आहे.