शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : मडगावात रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण करून लुटले, तिघांना अटक

By सूरज.नाईकपवार | Updated: February 28, 2024 16:22 IST

रेल्वेच्या एका कार्यक्रमासाठी मिथुन राज हे गोव्यात आले होते.

मडगाव : मडगावच्या कोकण रेल्वेस्थानकावरील एका अधिकाऱ्याला चार अज्ञातांनी मारहाण करून लुटण्याची खळबळजनक घटना रविवार, दि. २५ रोजी घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एक जण पसार आहे. समीर बेपारी (२६) , कासिम कुंदगन (२३), सादीक नालबंद (२२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिथुन राज के.के. (वय ३५) हे तक्रारदार आहेत. बेळगाव रेल्वेस्थानकावर कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

रेल्वेच्या एका कार्यक्रमासाठी मिथुन राज हे गोव्यात आले होते. चोरट्यांनी रेल्वेस्थानकावरच त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व बॅग असा साडेसहा हजारांचा ऐवज लंपास केला. भादंसंच्या ३९२ कलमाखाली कोकण रेल्वे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

तक्रारदार मिथुन यांना सावर्डे येथे अमृत भारत स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता ते मडगाव काेकण रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून स्वामी विवेकानंद रेल्वे हॉलिडे होमकडे जात असताना चार अज्ञातांनी त्यांना अडविले. संशयित साधारणत: २५ ते ३० वयोगटातील होते. त्यांनी तक्रारदाराला बुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्याकडील एक हजार रुपये व रेल्वे इमर्जन्सी ड्यूटी पास खिशातून काढून घेतला. नंतर जबरदस्तीने जवळच्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात नेऊन पाच हजार रुपये काढले व त्यांची बॅगही पळवून नेली. दरम्यान, कोकण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून एक जण पसार आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी