शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

राफेल व्यवहारात महाघोटाळा झालाय- प्रियंका चतुर्वेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 22:47 IST

संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेला राफेल विमान खरेदीचा व्यवहार हा देशाच्या सुरक्षेशी तडजोड करून करण्यात आलेला महाघोटाळा असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या संवाद निमंत्रक प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

पणजी-  संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेला राफेल विमान खरेदीचा व्यवहार हा देशाच्या सुरक्षेशी तडजोड करून करण्यात आलेला महाघोटाळा असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या संवाद निमंत्रक प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. गरज नसताना राफाल विमानांची खरेदीची किंमत वाढवून घेण्याचे काम करण्यात आले आहे. शिवाय विमानांची संख्या कमी करून देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली आहे. 526 रुपये कोटींचे विमान 1670 रुपये कोटींना विकत घेऊन जनतेच्या पैशांचे 41,205 रुपये कोटी नुकसान करण्यात आले आहे, असा आरोप चतुर्वेदी यांनी कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.राफेल विमानांसाठी 12 डिसेंबर 2012 रोजी आंतरराष्ट्रीय निविदा यूपीए-काँग्रेस सरकारच्या कालावधीत 126 विमाने खरेदी करण्यासाठी जारी झाली. त्यावेळी प्रत्येक विमानासाठी 526.10 रुपये कोटी किंमत ठरली होती. यातील 18 विमाने फ्रान्समधून तयार करून येणार होती तर 108 विमाने तंत्रज्ञान हस्तांतरण प्रक्रियेद्वारे भारतात हिंदुस्तान एरोनोटिक्स या सार्वजनिक आस्थापनाद्वारे तयार केली जाणार होती. या निविदेप्रमाणे त्यावेळी 36 विमानांची किंमत रुपये 18,940 कोटी होणार होती. पण 10 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तातडीची गरज भासवून पेरिसमध्ये 7.5 अब्ज युरो किंमतीत (प्रत्येक विमानासाठी रुपये 1670.70 कोटी किंमत) 36 विमाने विकत घ्यायचा निर्णय घेतला. या 36 विमानांची भारतीय चलनांतील किंमत रुपये 60,145 कोटी एवढी होती. डेसोल्ट एव्हीएशनचा वार्षिक अहवाल 2016 व रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकातून ते स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.या 36 विमानांतले पहिले विमान सप्टेंबर 2019 मध्ये तर शेवटचे विमान 2022 मध्ये यायचे आहे. म्हणजेच एप्रिल 2015 मध्ये करार केल्यानंतर आठ वर्षाच्या कालावधीनंतर. तेही भारताला चीन व पाकिस्तानकडून सुरक्षेचा धोका असताना. देशाच्या सुरक्षेकडे केलेली ही तडजोड नव्हे का? आणि ह्यतांतडीने खरेदी प्रक्रिया तत्वाच्या विरोधी व्यवहार नव्हे का असा प्रश्नही त्यांनी केला आहे. पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी याचे स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेस