शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रेडय़ाने घेतला गोव्यात  एका युवकाचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 20:59 IST

धीरयोच्या रेडयाने एका युवकाचा बळी घेण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील किनारपटटीभागात घडली. कोलवा पोलीस ठाण्याच्या हददीतील पालकोट - ओडली येथे रेडयाने किल्टन फर्नाडीस या बावीस वर्षीय युवकाच्या पाठीमागे शिंग खुपसल्याने त्याला जागीच मृत्यू आला.

- सूरज पवार

 मडगाव  - धीरयोच्या रेडयाने एका युवकाचा बळी घेण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील किनारपटटीभागात घडली. कोलवा पोलीस ठाण्याच्या हददीतील पालकोट - ओडली येथे रेडयाने किल्टन फर्नाडीस या बावीस वर्षीय युवकाच्या पाठीमागे शिंग खुपसल्याने त्याला जागीच मृत्यू आला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून तुर्त कोलवा पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले असून, रेडा मालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांनी दिली आहे.कायदेशीर मनाई असली तरी रेडयाच्या या झुंजीचे फॅड गोव्यात मोठया प्रमाणात असून, विशेषता सासष्टी तालुक्यात अनेकजण आपल्या पदरी रेडेही सांभाळतात. हेच रेडे जीवावरही बेतात हे आज बुधवारी सांयकाळी या  घटनेमुळे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. काहीवर्षापुर्वी फातोर्डा येथे धीरयाच्यावेळी रेडयाने एका युवकावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. राजकीय अभयामुळे पोलीसही धीरयावर कारवाई करतात कचरतात असा आरोप प्राणीप्रिय नागरिकांकडून सातत्याने होतो. आपल्या मित्रसमवेत  क्लिटन हा युवक रेडा  चरण्यासाठी घेउन गेला होता. परत येत असताना रेडयाने त्याच्यावर हल्ला चढविला. त्यात त्याचे जागीच निधन झाले. सांयकाळी पावणोसहाच्या दरम्यान ही घटना घडली.मयताबरोबर असलेल्या त्या युवकाची जबानी नोंद करुन रेडयाच्या मालकाचा शोध घेतला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :goaगोवाDeathमृत्यू