शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
6
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
7
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
8
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
9
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
10
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
11
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
12
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
13
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
14
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
15
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
16
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
17
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
18
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
20
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण

पुसापती अशोक गजपती राजू गोव्याचे नवे राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:51 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरयाणा, गोवा आणि लडाखसाठी नवीन राज्यपाल नियुक्त केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री पुसापती अशोक गजपती राजू यांची गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरयाणा, गोवा आणि लडाखसाठी नवीन राज्यपाल नियुक्त केले आहेत.

७४ वर्षीय पी. अशोक गजपती राजू हे तेलगू देसम पार्टीचे पूर्व नेते असून २६ जून १९५१ रोजी त्यांचा जन्म झाला. ते विजयनगर रियासतच्या राजघराण्यातील आहेत आणि विजयनगरच्या शेवटच्या महाराजांचे धाकटे पुत्र आहेत. प्रशासकीय आणि कायदेविषयक अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांनी आंध्र प्रदेश राज्य विधिमंडळाचे सदस्य म्हणून २५ वर्षाहून अधिक काळ काम केलेआहे. १३ वर्षे आंध्र प्रदेश सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. केंद्रात मोदी सरकारमध्ये त्यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री म्हणून काम केले आहे. 

सध्या गोव्यात पी. एस. श्रीधरन पिल्लई हे राज्यपाल होते. ७ जुलै २०२१ रोजी त्यांची गोव्यात नियुक्ती झाली होती. येथे त्यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ चार वर्षाचा राहिला. पिल्लई यांची आता कुठेही नियुक्ती झालेली नाही. ते मूळचे केरळचे असून अलीकडे वारंवार केरळवारी करत होते. 

दरम्यान, हरयाणाच्या राज्यपालपदी प्रा. आशिम कुमार घोष, लडाखच्या नायब राज्यपालपदी कविंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील नायब राज्यपाल ब्रिगेडियर (डॉ.) बी. डी. मिश्रा (निवृत्त) यांचा राजीनामा राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वीकारला आहे. काँग्रेसकडून स्वागत प्रदेश काँग्रेसने नव्या राज्यपालांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. पक्षाचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी असे म्हटले आहे की, एक अनुभवी संसद सदस्य गोव्याला राज्यपाल म्हणून मिळाला आहे. सार्वजनिक सेवा आणि संविधानिक बाबींमध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे. आम्हाला विश्वास आहे की। त्यांचा कार्यकाळ लोकशाही मूल्यांना बळकटी देईल, संविधानिक नियमांचे पालन करेल आणि गोव्याच्या लोकांच्या प्रगती आणि कल्याणात योगदान देईल.

गोव्याच्या जनतेच्यावतीने मी पुसापती अशोक गजपती राजू यांचे राज्यपाल म्हणून स्वागत करतो. ते प्रचंड प्रशासकीय आणि संसदीय अनुभव असलेले राजकारणी आहेत. विकसित गोव्याच्या दिशेने प्रवास करताना त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी अमूल्य ठरेल. त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार