शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'एमबीबीएस'साठी आणखी ५० जागा द्या; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 07:15 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन गोमेकॉत एमबीबीएससाठी अतिरिक्त ५० जागांचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली.

राज्य सरकारने याआधीच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (एनएमसी) हा प्रस्ताव पाठवलेला आहे तो मंजूर करण्यात यावा, अशी विनंती सावंत यांनी केली. त्याचबरोबर गोव्यातील गावडा, कुणबी, वेळीप आदी एसटी बांधवांना विधानसभेत आरक्षण देणारे विधेयक संसदेत संमत केल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.गोमेकॉत सध्या एमबीबीएसच्या २०० जागा आहेत. त्यातील ७० टक्के म्हणजेच १७० जागा गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. तर १५ टक्के जागा अखिल भारतीय कोट्यातून भरल्या जातात. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आशियातील सर्वात जुने महाविद्यालय असून ते गोवा विद्यापीठाशी संलग्न आहे.

गोवेकर विद्यार्थ्यांना १७० जागा कमी पडतात व त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी इतर राज्यांमधील मेडिकल कॉलेजांमध्ये किंवा परदेशात जावे लागते. अलीकडच्या काळात गोमेकॉचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. सुपर स्पेशालिटी ब्लॉक तसेच इतर अद्ययावत विभाग आलेले असून शिक्षणाची पुरेशी सोय व पायाभूत सुविधा असल्याने आणखी ५० जागा वाढवाव्यात, अशा मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे रीतसरपणे पाठवला आहे.

दरम्यान, केंद्रात भाजपची सत्ता असतानाच गोव्यातील एसटी समाजाला विधानसभेत आरक्षण देणारे विधेयक संसदेत संमत झाल्याने मुख्यमंत्र्यांनी गोवेकरांच्यावतीने नड्डा यांचे आभार मानले. एसींना २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत राखीवता देण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. 

दिल्ली येथे काल, बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट घेतली. यावेळी गोमेकॉत एमबीबीएसच्या जागा वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचेच सरकार असल्यामुळे गोमंतकीयांच्याही सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या दिसून येत आहेत. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाPoliticsराजकारण