शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांवर प्रथमच सामाजिक कार्यकर्ते संतप्त, टीका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 12:08 IST

हिंदी साहित्यिक असलेल्या गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्यावर गोव्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते प्रथमच खूप नाराज झालेले आहेत.

ठळक मुद्दे हिंदी साहित्यिक असलेल्या गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्यावर गोव्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते प्रथमच खूप नाराज झालेले आहेत. विरोधी पक्षाने या विषयावरून रान उठविलेले असताना राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा मात्र शांत आहेत. गोव्यात घटनात्मक पेचप्रसंग असताना राज्यपाल काहीच करत नसल्याने आम्ही राज्यपालांच्याही विरोधात आता मोहीम राबवू, असे आयरिश राड्रीग्ज यांनी स्पष्ट केले.

पणजी - हिंदी साहित्यिक असलेल्या गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्यावर गोव्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते प्रथमच खूप नाराज झालेले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणाच्या काळात सारे प्रशासन ठप्प झाल्याची टीका मंत्री व आमदारही करत आहेत. विरोधी पक्षाने या विषयावरून रान उठविलेले असताना राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा मात्र शांत आहेत. त्या कोणताच निर्णय घेत नसल्याने त्यांना राज्यपालपदी राहण्याचा अधिकारच नाही अशी टीका करत हायकोर्टाचे वकील व सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांनी संताप व्यक्त केला.

पर्रीकर सचिवालयात येत नाहीत. मंत्रिमंडळाच्या नियमितपणो बैठकाही होत नाहीत. मुख्यमंत्री लोकांना भेटत नाहीत. पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा दुसऱ्या एखाद्या मंत्र्याकडे सोपवावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी व विरोधी काँग्रेसने नुकताच पर्रीकर यांच्या करंजाळे येथील खासगी निवासस्थानी मोर्चा नेला. आपल्याला पर्रीकर यांना भेटायचे आहे असे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले पण पोलिसांनी मोर्चा अडवला व त्यांना भेटू दिले नाही.

पणजीतील आझाद मैदानावर आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी ठप्प प्रशासनाच्या निषेधार्थ उपोषण चालवले आहे. नऊ दिवस उपोषण सुरू आहे. विविध कार्यकर्त्यांनी घाटे यांना पाठींबा दिला. पर्रीकर सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी गोवा विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी  मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे यापूर्वी वारंवार केली पण राज्यपालांनी दखल घेतलेली नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी आता सभेचे आयोजन केले आहे. गोव्यात घटनात्मक पेचप्रसंग असताना राज्यपाल काहीच करत नसल्याने आम्ही राज्यपालांच्याही विरोधात आता मोहीम राबवू, असे आयरिश राड्रीग्ज यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकरPoliticsराजकारण