शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मडगाव : रेल्वे मार्ग विस्तारीकरणाला विरोध, पहाटे 5 वाजेपर्यंत रुळावर ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 12:26 IST

आंदोलकांनी बंद पाडले काम, हजारोंच्या संख्येने चांदर येथे लोक जमा

मडगाव :रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करणाऱ्या हजारो आंदोलकांनी पहाटे 5 वाजेपर्यंत चांदर येथे रेल्वे रुळावर ठाण मांडून आपल्या एकीचे प्रदर्शन केले. आंदोलकांचा हा रुद्रावतार पाहून रेल्वेने शेवटी आपले नियोजित काम बंद ठेवणेच पसंत केले.

रविवारी रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत रेल्वे मार्गाच्या विस्ताराचे काम  रेल्वेने हाती घेतले होते. मात्र हा विस्तार कोळसा वाहतुकीसाठी असल्याचा दावा करून ' गोयांत कोळसो नाका' या संघटनेने शनिवारी या विस्ताराला विरोध करण्यासाठी चलो चांदरची हाक दिली होती.या आवाहनाला प्रतिसाद देत  रविवारी रात्री हजारोंच्या संख्येने लोक चांदर येथे जमले. चांदर चर्च पासून लोकांनी मेणबत्ती मोर्चा काढला. यावेळी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. काही आंदोलक ढोल घेऊनही या आंदोलनात सामील झाले होते. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप या राजकीय पक्षानीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता. त्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यानीही या आंदोलनात भाग घेतला होता.

या आंदोलनाचे नेते अभिजित प्रभुदेसाई यांनी हा प्रतिसाद अभूतपूर्व असून आता तरी सरकारने लोकभावनेची कदर करून कोळसा वाहतुकीला पोषक असलेले सर्व प्रकल्प गुंडाळून ठेवावेत, असे आवाहन केले.

टॅग्स :goaगोवाrailwayरेल्वे