शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकरांनी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची घेतली बैठक, 230 कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 20:56 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेतली व त्यावेळी एकूण 230 कोटी रुपये गुंतवणुकीचे एकूण 7 प्रस्ताव मंजुर केले. दोन प्रकल्पांना दिलेली मान्यता मागे घेतली गेली.

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेतली व त्यावेळी एकूण 230 कोटी रुपये गुंतवणुकीचे एकूण 7 प्रस्ताव मंजुर केले. दोन प्रकल्पांना दिलेली मान्यता मागे घेतली गेली.

र्पीकर हे आजारी असल्याने यापूर्वी आयपीबीची बैठक घेऊ शकले नव्हते. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची यापूर्वी झालेली बैठक वादग्रस्त ठरली होती. कारण त्या बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे भुषविल्याचा दावा आयपीबीच्या काही सदस्यांनी केला होता. विरोधी काँग्रेस पक्षाने हा दावा खोटा असल्याचे म्हटले होते. सरकार या दाव्याचा प्रतिवाद करू शकले नव्हते. तथापि, त्यावेळी दहा मिनिटे मुख्यमंत्री  व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते असे आयपीबीचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी प्रथमच करंजाळे-दोनापावल येथील आपल्या खासगी निवासस्थानी आयपीबीची बैठक घेतली. मुख्यमंत्री पर्रीकर हे आयपीबीचे चेअरमन आहेत. माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हे उपाध्यक्ष आहेत.बैठकीनंतर मंत्री खंवटे यांनी पत्रकारांना सांगितले, की एकूण अकरा नवे प्रस्ताव बैठकीत चर्चेसाठी आले व त्यापैकी सात प्रस्ताव मंजुर केले गेले. श निर्मिती उद्योगासह विविध प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुर झाल्याने एकूण 230 कोटींची गुंतवणूक गोव्यात येईल. आम्हाला चांगले गुंतवणूकदार गोव्यात आलेले हवे आहेत. दोन प्रकल्पांची मान्यता मागे घेतली गेली, कारण त्यांनी काही मंजुरींचा गैरवापर केला होता. एक प्रस्ताव फेटाळला गेला. सुमारे चारशे रोजगार संधी आता निर्माण होतील.

मंत्री खंवटे म्हणाले, की पर्रीकर हे मंगळवारी आरोग्याच्यादृष्टीने चांगल्या स्थितीत होते. विरोधक जो संशय निर्माण करत आहेत, तो बैठकीमुळे दूर झाला. मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवून काही सूचनाही केल्या जेणोकरून पुढे कसे जावे हे स्पष्ट झाले. अशा प्रकारच्या बैठका वारंवार होतील.

दरम्यान, बंगळुरच्या ह्युजीस प्रिसिजन मॅन्युफेक्चरिंग उद्योगाकडून गोव्यात 41 कोटींची गुंतवणूक करून कारखाना सुरू केला जाणार आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा