शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या गोव्यात, प्रथमच मुक्ती दिन सोहळ्यात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 19:41 IST

Ramnath Kovind : उद्या सायंकाळी पाच वाजता कांपाल येथील जिमखाना मैदानावर होणाऱ्या सोहळ्यास राष्ट्रपती उपस्थित राहतील.

ठळक मुद्देराष्ट्रपती दोन दिवस गोव्यात असतील. ते वेर्णा येथील एका मंदिराला रविवारी भेट देतील.

पणजी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे उद्या शनिवारी दुपारी दीड वाजता गोव्यात सहकुटूंब आगमन होत आहे. गोव्याच्या साठाव्या मुक्तीदिन सोहळ्याचा आरंभ हा राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत केला जाणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता कांपाल येथील जिमखाना मैदानावर होणाऱ्या सोहळ्यास राष्ट्रपती उपस्थित राहतील. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी पणजीनगरी सजली आहे.

गोव्यात मुक्ती दिन सोहळ्यात यापूर्वी कधीच देशाचे राष्ट्रपती सहभागी होण्याची वेळ आली नव्हती. ती संधी उद्या येत आहे. सकाळी सरकारी पातळीवरून जो गोवा मुक्ती दिन सोहळा होईल, त्यावेळी राष्ट्रपती उपस्थित नसतील. तो कार्यक्रम वार्षिक पद्धतीनुसार होईल, पण सायंकाळी पाच वाजता राष्ट्रपती मुख्य सोहळ्यात भाषण करतील. राष्ट्रपती स्वत: पंचेचाळीस मिनिटे या सोहळ्यावेळी होणारा सांस्कृतिक कार्यक्रम पाहतील. गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन या सोहळ्यावेळी केले जाईल. 

दुपारी गोव्यात आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती राजभवनवर जातील. सायंकाळी जिमखाना मैदानावर येण्यापूर्वी ते येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्यासोबत असतील. 

राष्ट्रपती दोन दिवस गोव्यात असतील. ते वेर्णा येथील एका मंदिराला रविवारी भेट देतील. राष्ट्रपतींसोबत त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, अनेक मान्यवर, अधिकारी मिळून चाळीस व्यक्तींचा ताफा दिल्लीहून गोव्यात येणार आहे. पणजीत त्याबाबतची तयारी सुरू आहे. पणजीतील वाहतूक व्यवस्थाही आज सायंकाळी बदलली जाणार आहे. पणजीत आज शुक्रवारी देखील वाहतूक कोंडी अनुभवास आली. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदgoaगोवा