शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सिद्धांत शिरोडकरना राष्ट्रपती पदक जाहीर; डिसोझा, वेर्णेकरना उत्कृष्ट सेवा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2024 09:11 IST

बुडणाऱ्या भावंडांना जीवदान देणाऱ्या साहिलचा होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : वाहतूक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती सेवा पदक' जाहीर झाले आहे. तसेच एमटी विभागाचे पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षक विभागाचे पोलिस उपअधीक्षक तुषार वेर्णेकर यांना 'उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २६ रोजी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शिरोडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

देशभरात एकूण १,१३२ पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपती पदक १०२ जणांना तर ७५३ जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रपती पदकासाठी प्रत्येक राज्यातून अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली जाते. गोव्यातूनही त्याप्रमाणे शिफारस करण्यात येत असते.

दरम्यान, गोव्यातून पोलिस आणि अग्निशमन दलातील जवानांच्या नावाची यादी राष्ट्रपती पदकासाठी शिफारस केली जाते; परंतु गृहरक्षक दलाच्या जवानांची म्हणजेच होमगार्डची मात्र फार कमी वेळा शिफारस केली जात आहे. त्यामुळे गोव्यातील होमगार्डना क्वचितच राष्ट्रपती पदके जाहीर होतात.

'जी-२०' साठी आणि राष्ट्रीय स्पर्धेवेळी सुरक्षा व्यवस्थेत चांगली कामगिरी बजावल्यामुळे पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा, किरण पोडुवाल, सुर्नीता सावंत यांच्यासह ११ अधिकाऱ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. इतर अधिकान्यांत सुचेता देसाई, उपअ- धीक्षक जिवबा दळवी, सिद्धांत शिरोडकर, प्रबोध शिरवईकर, मनोज म्हार्दोळकर, निरीक्षक जॉन फर्नाडिस, चेतन सावलेकर आणि दितेश नाईक यांचा समावेश आहे. गोवा विद्यापीठ मैदानावर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात त्यांना ही प्रशस्तिपत्रे दिली जातील.

बुडणाऱ्या भावंडांना जीवदान देणाऱ्या साहिलचा होणार सन्मान

वाळपई येथील नाणूस- बेतकेकरवाड्यावरील साहिल भिसो लाड युवकाला राष्ट्रीय स्तरावरील 'उत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाले आहे. म्हादई नदीत बुडणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून साहिल याने जीवदान दिले. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात त्याला हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी इम्रान (१३), रेहान (१०) आणि असिफ शेख (१६) ही तीन भावंडे आंघोळीसाठी नदीत उतरली होती. अचानक हे तिघेजण गटांगळ्या खाऊ लागल्याने १७ वर्षांच्या साहिलने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नदीत उडी घेत या तिघांना वाचविले. त्यामुळेच वाळपई येथील नागरिकांनी त्याला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती. आता त्याच्या या शौर्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव होणार आहे.

साहिलला राष्ट्रीय स्तरावरील 'उत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करताना मला आनंद होत आहे. आव्हानांनी भरलेल्या या जगात साहिलसारख्या युवकांनी दाखवलेले शौर्य हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे. - विश्वजित राणे, नगर नियोजन मंत्री. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस