शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'इनफ इज इनफ'ची घेतली राष्ट्रपती मुर्मू यांनी अखेर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 07:32 IST

माजी न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेल्या १० कलमी मागण्यांची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोवा सरकारला त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यातील पर्यावरण रक्षण आणि अनियंत्रित बांधकामांविरोधात सुरू असलेल्या 'इनफ इज इनफ' जनआंदोलनाला आता थेट राष्ट्रपती पातळीवरून मोठा आधार मिळाला आहे. माजी न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेल्या १० कलमी मागण्यांची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोवा सरकारला त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

रिबेलो यांनी गोव्यातील निसर्ग, डोंगर, शेतीजमिनींचा होत असलेला ऱ्हास, तसेच बेसुमार बांधकामांबाबत राष्ट्रपतींना सविस्तर पत्र पाठवले होते. या पत्रानंतर राष्ट्रपती भवनाकडून संबंधित मागण्यांची गंभीर दखल घेत राज्य प्रशासनाला हालचाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या मागण्यांमध्ये नगरनियोजन कायद्यातील कलम १७ (२) आणि ३९ (अ) तातडीने रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे. तसेच कलम १७ (अ) अंतर्गत होणारी डोंगरफोड थांबवणे, शेतीयोग्य जमिनींचे निवासी प्रकल्पांमध्ये रूपांतर रोखणे, मोठ्या प्रकल्पांपूर्वी पाणी, वीज व कचरा व्यवस्थापन क्षमतेचा वैज्ञानिक अभ्यास करणे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. 

याशिवाय, मांडवी नदीतील कॅसिनो आणि प्रदूषण रोखणे, जैवविविधता व पाणथळ जागांचे संरक्षण, नगरनियोजन विभागातील भ्रष्टाचारावर लगाम, तसेच बेकायदेशीर मेगा प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याच्या मागण्या देखील करण्यात आल्या आहेत. स्थानिक ग्रामसभा व पंचायतींना विश्वासात घेऊनच प्रादेशिक आराखडा तयार करण्याचीही भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.

राष्ट्रपती भवनाकडून आलेल्या निर्देशांची दखल घेत गृह विभागाचे अवर सचिव मंथन मनोज नाईक यांनी मुख्य नगरनियोजक तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कार्यवाही सुरू केली आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, गोव्यातील अनियंत्रित विकासावर नियंत्रण आणण्यासाठी निर्णायक पाऊल ठरू शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : President Murmu Addresses 'Enough is Enough' Movement in Goa

Web Summary : President Murmu intervened in Goa's 'Enough is Enough' movement against environmental damage and uncontrolled construction. Following a letter highlighting concerns, she directed the Goa government to act on demands, including revisions to planning laws and curbing illegal projects.
टॅग्स :goaगोवाDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूState Governmentराज्य सरकार