शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांप्रश्नी कराराचे 11 डिसेंबरला होणार आमदारांसमोर सादरीकरण, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 21:37 IST

पणजी : नद्यांप्रश्नी जो कराराचा मसुदा आहे, त्याविषयीचे सादरीकरण येत्या 11 डिसेंबर रोजी सर्व आमदारांसमोर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. साळसारखी नदी केंद्र सरकारने किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रदूषित केलेली नाही. आम्ही गोमंतकीयांनीच ती केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.नद्यांचे राष्ट्रीयीकरण मुळीच करण्यात ...

पणजी : नद्यांप्रश्नी जो कराराचा मसुदा आहे, त्याविषयीचे सादरीकरण येत्या 11 डिसेंबर रोजी सर्व आमदारांसमोर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. साळसारखी नदी केंद्र सरकारने किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रदूषित केलेली नाही. आम्ही गोमंतकीयांनीच ती केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नद्यांचे राष्ट्रीयीकरण मुळीच करण्यात आलेले नाही. जलमार्गाना राष्ट्रीय महत्त्व दिले गेले आहे. संसदेत हा कायदा संमत झाला तेव्हा काँग्रेसने त्यास विरोध केला नाही. खासदार शांताराम नाईक यांनी कायद्याच्याबाजूनेच मतदान केले. आता लोकांची व पंचायतींची काहीजण दिशाभूल करत आहेत. कुणी तरी शिकवून पाठविल्याप्रमाणो एक-दोघे ग्रामसभांमध्ये उठतात व ठराव मांडतात. आम्ही कराराच्या मसुद्यामध्ये ज्या अटी घातल्या आहेत, त्या सगळ्य़ा अटींसह केंद्र सरकारने मसुदा मान्य केला आहे. नद्यांची मालकी केंद्र सरकारकडे जात नाही. ती गोव्याकडेच राहते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नद्या उसपणो किंवा स्वच्छ करणो यासाठी केंद्र सरकार खर्च करील. नद्यांचे राष्ट्रीयीकरण झालेलेच नसल्याने ग्रामसभांमधील त्याबाबतचे ठराव हे शाब्दिकदृष्टय़ा अर्थहीन व रद्दबातल ठरतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पूर्वी दाबोळी विमानतळाचा विषय होता. तो विषय संपल्यानंतर आता काही जणांनी सरकारबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी नद्यांचा व कोळसा हाताळणीचा विषय हाती घेतला आहे. येत्या 11 रोजी आमदारांसमोर मसुद्याचे सादरीकरण झाल्यानंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ. कोळसा हाताळणीच्या विस्ताराला आम्ही विरोध केला आहे व त्यामुळेच केंद्र सरकारने विस्ताराची प्रक्रिया बंद ठेवली आहे. अदानी कंपनीला कामाचा आदेश हा भाजप सरकारच्या काळात दिला गेलेला नाही. तो काँग्रेस सरकारच्या काळात दिला गेला. त्याबाबतची कागदपत्रे आपण विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सादर करीन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अदानी कंपनी म्हणजे भाजपला प्रिय असे चित्र काँग्रेस पक्ष निर्माण करू पाहत आहे. अदानीला आम्ही गोव्यात आणले नाही. गोव्यातील नद्यांमधील कॅसिनो देखील काँग्रेसच्याच राजवटीत आणले गेले. पैसे खाऊन ते कॅसिनो आणले गेले होते, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

नद्यांना राष्ट्रीय महत्त्व देण्याचा मूळ कायदा हा 1982 साली केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेत असताना आणला गेला होता. त्यावेळी देशातील फक्त दोनच नद्यांचा समावेश केला गेला होता. 2016 साली भाजप सरकारने तो कायदा सुधारित रुपात आणला. जोर्पयत गोवा सरकार गोव्यातील नद्यांविषयी एखादे काम करायला केंद्र सरकारला सांगणार नाही किंवा परवानगी देणार नाही, तोर्पयत केंद्र सरकार ते काम करू शकणार नाही. कोळशाला विरोध करणा:यांनी वीजेचा वापर कमी करावा. फ्रीज, गिझर वगैरे वापरू नयेत, थंड पाण्याने आंधोळ करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर