शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
5
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
6
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
7
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
8
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
9
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
10
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
11
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
12
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
13
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
14
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
15
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
16
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
17
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
18
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
19
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
20
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

गोव्यात वीजमंत्र्याच्या बंगल्याला आठवडाभरातच अधिवास दाखला, आरटीआय माहितीतून उघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 1:30 PM

पणजी : जुने गोवे येथील वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी बंगल्याला स्थानिक पंचायतीकडून आठवडाभराच्या आत अधिवास दाखला देण्यात आल्याचे आरटीआय अर्जाला प्राप्त झालेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. आयरिश रॉड्रिग्स यांनी आरटीआय अर्ज केला होता. मडकईकर यांच्या निकिताशा रीयाल्टर्स प्रा. लि ने गेल्या ५ जानेवारीला अर्ज केला आणि ११ जानेवारीला त्यांना अधिवास दाखला देण्यात आला. ...

पणजी : जुने गोवे येथील वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी बंगल्याला स्थानिक पंचायतीकडून आठवडाभराच्या आत अधिवास दाखला देण्यात आल्याचे आरटीआय अर्जाला प्राप्त झालेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. आयरिश रॉड्रिग्स यांनी आरटीआय अर्ज केला होता. मडकईकर यांच्या निकिताशा रीयाल्टर्स प्रा. लि ने गेल्या ५ जानेवारीला अर्ज केला आणि ११ जानेवारीला त्यांना अधिवास दाखला देण्यात आला. ८ जानेवारीला पंचायतीने बैठकीत याला मान्यता दिली. बांधकामाचा परवानाही १५ दिवसात देण्यात आला. १५ जानेवारी २0१३ रोजी अर्ज करण्यात आला होता. पंचायतीने २ फेब्रुवारी २0१३ रोजी बांधकाम परवाना दिला. अभियंता परेश गायतोंडे यानी त्यावेळी पंचायतीला दिलेल्या पत्रातील माहितीनुसार या आलिशान बंगल्याचा अंदाजित खर्च १ कोटी ४२ लाख ४६ हजार ४८५ रुपये आहे. 

माशेल येथील स्वरभूमी बिल्डर्सकडून निकिताशा रीयाल्टर्स प्रा. लि च्या व्यवस्थापकीय संचालक जेनिता मडकईकर यांनी ११ आक्टोबर २00४ रोजी २0 लाख रुपये मोजून ३५,१२५ चौरस मीटर भूखंड खरेदी केला. त्यावेळी मडकईकर हे महसूलमंत्री होते. या कृषी जमिनीत सागवानची २0, फणसाची ४, आंब्याची ३, ३0 माड आदी झाडे होती. ७ फेब्रुवारी २00८ रोजी या जमिनीचे रुपांतर झाले आणि ३ मार्च २00८ रोजी त्यांना सनद प्राप्त झाली. त्यावेळी मडकईकर हे वाहतूकमंत्री होते, असे आयरिश यांनी आरटीआय अर्जाच्या उत्तराचा हवाला देताना म्हटले आहे.