शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात राजकीय हालचालींना वेग; फुटीर गटाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

By किशोर कुबल | Updated: September 14, 2022 12:12 IST

Goa : मुख्यमंत्र्यांच्या दालनात काँग्रेस फुटीर आमदारांबरोबर प्रमोद सावंत यांची चर्चाही झाली. 

पणजी : फुटीर काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुटीर काँग्रेस आमदारांबरोबर प्रमोद सावंत यांची चर्चाही झाली. वैध फुटीसाठी दोन तृतीयांश संख्याबळ होत नसल्याने या आठ आमदारांचा भाजप प्रवेश अडला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या फुटीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या. गेल्या दोन दिवसात या हालचालींना वेग आला होता.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी सभापती रमेश तवडकर हे दिल्लीला असल्याने या आठ आमदारांचा हा गट भाजपात विलीन करण्यात येत असल्याचे पत्र विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांना सादर करण्यात आले. केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमांव,  हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा वगळता अकरापैकी अन्य आठ काँग्रेसचे आमदार सभापतींच्या कार्यालयात सकाळीच १० वाजताच पोहोचले होते.

काँग्रेस विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून चालू होता. जुलैमध्ये विधानसभा अधिवेशन तोंडावर असताना दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदारांचे संख्याबळ न झाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु आता आठ आमदार एकत्र आले आहेत. यात संकल्प आमोणकर यांचाही समावेश आहे. संकल्प हे सुरुवातीपासून आपण  काँग्रेसकडे निष्ठावान असल्याचे दाखवत होते. परंतु आता ते फुटीर गटाबरोबर आहेत.

पोलिसांकडून पत्रकारांनाही मज्जावकाँग्रेसी फुटीर आमदारांचा गट विधानसभेत पोचण्यापूर्वीच पोलिसांनी विधानसभेत संकुलाच्या प्रमुख गेट्स घडविल्या. पत्रकारांनही आत जाऊ दिले नाही. जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मंत्रालयात खात्यांच्या कामांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ही परिषद कव्हर करण्यासाठी आलेल्या पत्रकारांनाही प्रवेश मनाई करण्यात आली.

सभापती दिल्लीहून गोव्याकडेकाँग्रेसी फुटीर आमदारांच्या ताज्या राजकीय घडामोडींची माहिती दिल्लीत सभापती रमेश तोडकर यांना देण्यात आली. ते तातडीने दिल्लीहून गोव्याकडे येण्यासाठी निघाले आहेत.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसPramod Sawantप्रमोद सावंत