शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात गणपती विसर्जनावेळी राजकीय नेतेही सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 15:50 IST

गणेशोत्सव साजरा करण्यामधील गोमंतकीयांचा उत्साह वाढतच असून सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मिरवणुकीत यंदा जास्त लोक सहभागी झाले.

पणजी - गोव्यात अकरा दिवसांच्या गणेशाचे विसर्जन गुरुवारी मोठ्या थाटामाटात करण्यात आले. गणेशोत्सव साजरा करण्यामधील गोमंतकीयांचा उत्साह वाढतच असून, सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मिरवणुकीत यंदा जास्त लोक सहभागी झाले. विशेष म्हणजे विविध भागांमध्ये राजकीय नेत्यांनीही सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन घेणे, विसजर्नावेळी त्यांच्या मिरवणुकांमध्ये भाग घेणे याबाबत यावेळी बरीच सक्रियता दाखवली.केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक हे यंदा पूर्ण गणेशोत्सव काळात गोव्यातच होते. त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गणेशोत्सव साजरा केलाच,शिवाय स्वत: गणेशमूर्ती डोक्यावर घेऊन त्या मूर्तीचे विसर्जन करतानाचे फोटोही काढून सोशल मिडियावर शेअर केले. नदीत गणेशमूर्तीचे विसर्जन करून आल्यानंतर नाईक हे स्वत: होडी वल्हवतात, असे दाखवून देणारा व्हीडीओही नाईक यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावर बरीच चर्चा रंगली आहे. नाईक यांनी म्हापसा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन घेतलेच, शिवाय प्रथमच पणजी पोलीस स्थानकालाही त्यांनी भेट दिली व तेथील गणेशमूर्तीचे दर्शन घेतले.कळंगुटचे आमदार व राज्याचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांनीही कळंगुटमधील सार्वजनिक गणेशाचे दर्शन घेतले. श्री शांतादुर्गा मंदिरातील सार्वजनिक गणेश मूर्तीच्या विसर्जनावेळी मंत्री लोबो यांनी जिल्हा पंचायत सदस्यांसोबत विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कोठंबी गावातील निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी मंत्री लोबो आणि मुख्यमंत्री सावंत यांनी पारंपारिक वाद्ये वाचविली व गणेशाची आरती केली. सर्वधर्मियांमधील सलोखा गणेशोत्सवासारख्या सणांमुळे वाढीस लागतो, अशी प्रतिक्रिया मंत्री लोबो यांनी व्यक्त केली.सार्वजनिक गणेशोत्सवांचे दर्शन घेण्याबाबत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हेही मागे राहिले नाहीत. त्यांनीही म्हापसा येथील गणेशोत्सवाला भेट दिली. माजी मुख्यमंत्री व विद्यमान ज्येष्ठ आमदार लुईझिन फालरो यांनीही सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेतले. राज्याचे नगर नियोजन मंत्री बाबू कवळेकर हेही केपेतील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी झाले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन